दहिवडला दानशूर मान्यवरांची बैठक संपन्न..!* ( दहिवड युवराज देवरे प्रतिनिधी) आज शनिवार दि.२७/०६/२०२० जि प प्राथमिक शाळा दहिवड ता देवळा जि नाशिक येथे शासकीय नियमानुसार शाळा व्यवस्थापन समितीची मिटींग आयोजित करण्यात आली होती.

0
32

*दहिवडला दानशूर मान्यवरांची बैठक संपन्न..!*
( दहिवड युवराज देवरे प्रतिनिधी)
आज शनिवार दि.२७/०६/२०२० जि प प्राथमिक शाळा दहिवड ता देवळा जि नाशिक येथे शासकीय नियमानुसार शाळा व्यवस्थापन समितीची मिटींग आयोजित करण्यात आली होती.
मिटींगचे अध्यक्षस्थान माजी केंद्र प्रमुख कवी लेखक सा.का. श्री.वा.गं.सोनवणे यांना देण्यात आले होते.सदर वेळी सरपंच आदिनाथ ठाकुर शा. व्य.स.अध्यक्ष मंगल देवरे समिती सदस्य राहूल सोनवणे कॄष्णा पवार बाजीराव सोनवणे दयाराम देवरे समाधान मोरे दिपाली मोरे मुख्याध्यापक सावंत सर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व द्वारकाधिश देवरे प्रहार शेतकरी संघटना देवळा तालुका अध्यक्ष संजय दहिवडकर उपस्थित होते.
मिटींगमध्ये शाळा प्रवेशद्वार साठी देणगी देणारे श्री कैलास रामदास देवरे उद्योजक उमराणे शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणी पुरवठा पाण्याच्या टाकीसाठी ६००० लिटर बांधकाम सहित निधी देणा-या श्री. वा.गं.सोनवणे यांच्या अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here