0
144

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी    पुणे 26 जून पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचा मोठा निर्णय हॉटस्पॉट भागावर असणार ड्रोन ची नजर. त्याच बरोबर पुढील तीन दिवसासाठी शहरातील मुख्य बाजारपेठा बंद ठेवण्यात येतील. पुणे जिल्ह्यात कोरोणा रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत चाललेली आहे पिंपरी चिंचवड मध्ये ही रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे त्यामुळे यापुढे हॉटस्पॉट वर ड्रोन ची नजर असणार आहे पिंपरी-चिंचवड शहरातील इतर सार्वजनिक ठिकाणी ड्रोन फिरणार असून लोकांवर नजर ठेवली जाणार आहे असे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी माहिती दिली नागरिक नियमाचे पालन करत नसल्यामुळे नियमाचे पालन न करणारे नागरिक ड्रोन द्वारे आढळून आल्यास त्या नागरिकां वरती कारवाई करण्यात येईल असे आयुक्त हर्डीकर यांनी स्पष्ट केले ड्रोन ची नजर असणारे भाग आनंदनगर दापोडी नेहरूनगर भाटनगर बुद्ध नगर रमाई नगर साईबाबा नगर दिघी हे परिसर हॉटस्पॉट असल्याने येथे अधिक सतर्कता बाळगून ड्रोन द्वारे नजर ठेवली जाणार आहे त्याच बरोबर पोलिसांचा अधिकचा बंदोबस्तही तैनात केला जाणार असल्याचं हर्डीकर यांनी सांगितलं दरम्यान अनलॉक-1ची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सर्व शहरा मधील लॉक डाऊन मधील शिथिलता आणली जात आहे यामुळे नागरिकांना बाहेर पडणं शक्य होत आहे मात्र त्याच वेळी आता पुणे पिंपरी चिंचवड या भागातील कोरोना बाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड प्रशासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे वारंवार सांगूनही बाजारपेठेमध्ये सोशल डिस्टन्सिग आणि आणि सम विषम पद्धतीने दुकाने सुरू ठेवण्यासाठी घालून दिलेल्या नियमाचे पालन होत नसल्याने आता अखेर पुढील तीन दिवसासाठी शहरातील मुख्य बाजारपेठा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांनी याबाबतचा आदेश काढला आहे… —. युवा मराठा न्यूज प्रतिनिधी…– सिद्धांत चौधरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here