मी तडजोड करणार नाही!…तुकाराम मुंढे भूमिकेवर ठाम! ✍️नागपूर ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज ) नागपूर:⭕ आयुक्त विश्वासात घेत नाहीत,

0
31

🛑 मी तडजोड करणार नाही!…तुकाराम मुंढे भूमिकेवर ठाम! 🛑
✍️नागपूर ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नागपूर:⭕ आयुक्त विश्वासात घेत नाहीत, विभागातील कामं होत नाहीत, फोन घेतले जात नाहीत, अशा स्वरुपाच्या तक्रारी नागपूरमधील नगरसेवकांकडून तुकाराम मुंढे यांच्याविरोधात केल्या जात आहेत. यावर बोलताना विश्वासात घेण्याची नेमकी व्याख्या काय, असा सवाल आयुक्त मुंढेंनी उपस्थित केला. नगरसेवकांच्या मनासारखं काम केलं, त्यांचं ऐकल्यावर विश्वासात घेतलं आणि त्यांच्या मनाविरुद्ध काही घडलं की विश्वासात घेतलं जात नसल्याची ओरड होत असल्याचं मुंढेंनी सांगितलं.

नगरसेवकांनी केलेल्या वैयक्तीक स्वरुपाच्या टीकेमुळे गेल्या आठवड्यात महासभेतून निघून गेले.
तुम्ही आवाज चढवून बोलणार असाल तर मी सभागृहात थांबणार नाही, असं आधीच नगरसेवकांना सांगितलं होतं. मात्र तरीही आवाज चढवून वैयक्तिक स्वरुपाची टीका केली गेली. तुम्ही तुकाराम नावाला कलंक आहात, असं म्हटलं गेलं. माझी तुलना ब्रिटिशांशी केली गेली. त्यावेळी महापौरांनी तोंडातून एक शब्द काढला नाही. त्यांनी नगरसेवकांना शांत राहायला सांगणं अपेक्षित होतं. ती त्यांची जबाबदारी होती, असं तुकाराम मुंढे म्हणाले.
कोरोना संकटाच्या काळात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीनं माझं काम सुरू आहे. शहराच्या हितासाठी आवश्यक पावलं उचलली जात आहेत. प्रत्येक निर्णय नगरसेवकांपर्यंत पोहोचवला जात आहे. त्यांच्या शिफारसी मागवल्या जात आहेत. पण अनेकदा कोरोना सेंटर उभारायला विरोध केला जातो. हॉस्पिटल, क्वारंटिन सेंटर शहराच्या बाहेर करा, असे सल्ले दिले जातात. माझं घर सोडून कन्टेनमेंट झोन करा, अशा शिफारशी केल्या जातात. हे सल्ले ऐकले नाही की मग आयुक्त विश्वासात घेत नाही, अशी ओरड सुरू होते. त्यामुळे विश्वासात घेण्याची नेमकी व्याख्या काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नागरिकांच्या हिताशी मी कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली….⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here