युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी     पुणे 25 जून युवा नेते आमदार रोहित पवार यांचा पलटवार पडळकरानवती कडाडून टीका रोहित पवार यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व आमदार गोपीचंद पडळकर यांचा चांगलाच समाचार घेतला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर ती केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले

0
27

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी     पुणे 25 जून युवा नेते आमदार रोहित पवार यांचा पलटवार पडळकरानवती कडाडून टीका रोहित पवार यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व आमदार गोपीचंद पडळकर यांचा चांगलाच समाचार घेतला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर ती केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले राज्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यांनी गोपीचंद पडळकर व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली गोपीचंद पडळकर यांचं राजकीय स्टेटमेंट होतो त्यांचे विधान त्यांच्याच नेत्यांना चुकीचं वाटलं पवार साहेब जनतेच्या हृदयात बसले आहेत गेल्या 55 वर्षापासून ते सामाजिक काम करत आहेत पडळकर यांचं वय नाही तेवढे दिवस पवार साहेब समाजहिताचे काम करत आहेत त्यामुळे अशा मोठ्या लोकांच्या विरोधात बोलल्यावर जर कोणाला वाटत असेल आपली पोळी भाजेल तर तो गैरसमज असेल आम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो पडळकर चुकले हे त्यांच्या नेत्यांनी दाखवून दिलं म्हणून मी कुणाचाही वेळ वाया घालवणार नाही व कार्यकर्त्यांना आवाहन करतो कुणीही ही अशा लोकांकडे लक्ष देऊ नये नियमाचे उल्लंघन करू नये तुमचे मन दुखावले असेल तर खालच्या पातळीवर राजकारण करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा असे आवाहन आमदार रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here