छत्रपती संभाजीराजेंनी अनुभवले बळीराजाचे कष्ट! ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

0
109

🛑 छत्रपती संभाजीराजेंनी अनुभवले बळीराजाचे कष्ट! 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

कोल्हापूर :⭕ देशासह राज्यात सध्या मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पेरणीच्या कामाला वेग आला आहे. त्यातच छत्रपती संभाजीराजेंनी कोल्हापूर जिल्ह्यातील केर्ली परिसरातील एका शेतात सुरु असलेल्या पेरणीच्या वेळी चक्क शेतात जाऊन शेतकऱ्यांसोबत तिफण ओढली. सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
याची माहिती देण्यासाठी संभाजी राजेंनी ट्विटरवर काही ट्विट केले आहेत. धरणी मातेला स्वतःच्या घामाने भिजवून जगाला पोसणाऱ्या बळीराजाला किती कष्ट सोसावे लागतात याचा अनुभव यानिमित्ताने घेता आला. माझा श्वास तिफणीला ओढताना एका फेरीतच फुलून गेल्यामुळे लगेच मला मास्क काढून ठेवावा लागला, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
संपूर्ण जगाला कोरोनाच्या संकटामुळे थांबावे लागले. पण बळीराजाला थांबून चालणार नाही, अन तो थांबणारही नाही त्याचबरोबर हा अनुभव मला समृद्ध करून गेला. जगाच्या पोशिंद्या शेतकरी राजाचे संपूर्ण जगाने ऋण व्यक्त करत त्यांचा सन्मान केला पाहिजे, अशी भावना संभाजीराजे यांनी व्यक्त केली…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here