दहिवडला पुन्हा बिबटयाचा धुमाकूळ आज रविवारी परत एक गो-हा ठार*

0
33

*दहिवडला पुन्हा बिबटयाचा धुमाकूळ आज रविवारी परत एक गो-हा ठार*
दहिवड,(राहुल मोरे युवा मराठा न्युज)-देवळा तालुक्यातल्या दहिवड परिसरातील खडकी मळा भागात आज रविवारी पुन्हा बिबटयाने आपली दहशत कायम ठेवत एका गो-ह्यावर हल्ला चढवत गो-हा जागीच ठार केला.
दोन दिवसापुर्वीची घटना ताजी असतानाच आज रविवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा बिबटयाने शेतकरी काशिनाथ कृष्णा पवार यांच्या खडकी मळा येथील गट नंबर ८५९ मध्ये गो-ह्यावर हल्ला चढवित गो-हा ठार केला.सदरची घटना हि दोन दिवसापुर्वी घडलेल्या घटनास्थळापासून अवघ्या ७००/८०० मिटर अंतरावर असल्याने त्यामुळे जंगलात राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.देवळा वनविभागाने या परिसरात तात्काळ पिंजरा लावून बिबटयाचा बंदोबस्त करावा व गोधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी वनविभागाने तातडीने पाऊल उचलावीत अशी मागणी दहिवड ग्रामपंचायत व प्रहार संघटनेचे देवळा तालुकाध्यक्ष संजय दहिवडकर यांनी वनविभागाकडे केली आहे.

Previous articleजनावरांचा बाजार भरविल्यास* *कोरोना व्हायरसला आमंत्रणच.*
Next article*अभिनेता सुशांत सिंग राजपुतने केली आत्महत्या, राहत्या घरात लावला गळफास*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here