भारतीय डाक विभागात ४ हजारांहून अधिक पदांची भरती

0
38

🛑 भारतीय डाक विभागात ४ हजारांहून अधिक पदांची भरती 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 11 जून : ⭕ भारतीय डाक विभागाकडून हजारो पदांवर मेगा भरती काढली आहे. या पदांसाठी करण्याचा अर्ज इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइट appost.in मार्फत करता येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ८ जून सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. भारतीय डाक विभागाकडून ४ हजार १६६ पदांसाठी मेगा भरती काढण्यात आली आहे.

या एकूण पदांची भरती हरियाणा पोस्टल सर्कलमध्ये ६०८ पदांची भरती करण्यात येणार येणार आहे. तर मध्य प्रदेश पोस्टल सर्कलमध्ये २ हजार ८३४ पदांसह उत्तराखंड पोस्टल सर्कलमध्ये ७२४ पदांवर भरती होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या निघालेल्या मेगा भरतीसाठी कमीतकमी १८ तर जास्तीत जास्त ४० वयवर्षाची मर्यादा आहे.

या एकूण पदांची भरती हरियाणा पोस्टल सर्कलमध्ये ६०८ पदांची भरती करण्यात येणार येणार आहे. तर मध्य प्रदेश पोस्टल सर्कलमध्ये २ हजार ८३४ पदांसह उत्तराखंड पोस्टल सर्कलमध्ये ७२४ पदांवर भरती होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अशी असतील अटी :-

या निघालेल्या मेगा भरतीसाठी कमीतकमी १८ तर जास्तीत जास्त ४० वयवर्षाची मर्यादा आहे. आरक्षणानुसार जास्तीत जास्त वयोमर्यादेमध्ये सवलतीचा लाभही देण्यात येणार आहे. हे वय ८ जून २०२० पर्यंत मोजले जाणार आहे. या पदांकरता ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ८ जून २०२० सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारिख ७ जुलै २०२० पर्यंत असणार आहे.

अशी असेल मुलाखत प्रक्रिया :-

या पदांवरील उमेदवारांना मुलाखत न देता किंवा कोणतीही परीक्षा न देता नोकरी मिळणार आहे. दहावीमध्ये मिळवलेल्या अर्जाच्या आणि गुणांच्या आधारेच गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे.⭕

Previous articleपुण्यात रात्री हेलिकॉप्टर फिरताना दिसतात
Next articleमराठा एस ई बीसी. आरक्षणाच्या विरोधात नव्याने याचिका दाखल!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here