भारतीय हद्दीत घुसण्याच्या तयारीत आहे चीन, लडाखजवळ दिसली लढाऊ विमानं

0
29

🛑 भारतीय हद्दीत घुसण्याच्या तयारीत आहे चीन, लडाखजवळ दिसली लढाऊ विमानं 🛑
मुंबई 🙁 साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

नवी दिल्ली, 02 जून :⭕ भारत-चीनमध्ये (India-China border dispute) लडाखवरून वास्तविक नियंत्रण रेषेत (एलएसी) सीमा विवादात तणाव आहे. त्यामुळे भारताचं सीमाभागातील चीनच्या सर्व हालचालींवर लक्ष आहे. दरम्यान, लडाखपासून अवघ्या 30-35 किमी अंतरावर एलएसीजवळ चिनी सैनिकांचं लढाऊ विमान (Chinese fighters flying)उड्डाण करताना दिसल्याचं सांगण्यात येत आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या म्हणण्यानुसार, चीनी लढाऊ विमान होटन और गरगुंसाच्या लक्ष्यापासून सुमारे 100-150 किमी अंतरावर आहेत.

चीनच्या लडाख सीमेजवळ सुमारे 10-12 लढाऊ विमान तैनात केले असून ही सर्व भारतीय हद्दीत उड्डाण करत असल्याची माहिती वृत्तसंस्थेला सूत्रांकडून मिळाली आहे. हे लढाऊ विमान होटन और गरगुंसामधील विमानतळांवरून उड्डाण करत आहेत आणि लडाख क्षेत्रापासून 30-35 किलोमीटर अंतरावर आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत या लढाऊ विमान जे -11 आणि जे -7 च्या हालचालींवर बारीक नजर ठेवून आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी सैन्य आंतरराष्ट्रीय नियमांनुसार भारतीय प्रदेशांपासून 10 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर आहे. भारतीय सैन्याची नजर होटन तळावर आहे. कारण, पाकिस्तानी वायुसेनाही तिथल्या पीएलए हवाई दलाबरोबर सराव करत आहे. या वर्षाच्या मे महिन्यात चीनने चकमकीची परिस्थिती निर्माण होताच भारताने आपले सुखोई -30 एमकेआय विमान तयार केले होते.

भारत चीनकडून होत असलेल्या सर्व कामांवर बारकाईने नजर ठेवून आहे, असं सूत्रांचं म्हणणं आहे. भारतीय गुप्तचर संस्था चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. गेल्या वर्षीदेखील 6 पाकिस्तानी जेएफ -17 च्या हालचालींवर भारताने नजर ठेवलं होतं, असं सूत्रांचं म्हणणं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील लडाखच्या पश्चिमेला भाग असलेल्या स्कार्डू एअरफील्डवरून होटनकडे पाकिस्तानी विमानानं उड्डाण केलं. यानंतर पाकिस्तानी लष्कराने इथल्या शमीन -8 नावाच्या एका अभ्यासात भाग घेतला होता.⭕

Previous articleदेशातील एकूण कोरोना बळींपैकी 94 टक्के मृत्यू फक्त 8 राज्यात!
Next articleमुंबईचा एकही प्रवासी रेल्वेतून उतरला नाही
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here