देशातील एकूण कोरोना बळींपैकी 94 टक्के मृत्यू फक्त 8 राज्यात!

0
32

🛑 देशातील एकूण कोरोना बळींपैकी 94 टक्के मृत्यू फक्त 8 राज्यात! 🛑
मुंबई 🙁 साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने होताना दिसत आहे. मात्र, कोरोना विषाणूचा प्रसार हा काही राज्यांमध्येच मोठ्या प्रमाणात झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 1 लाख 90 हजार 535 इतका आहे. यापैकी 1 लाख 29 हजार 21 कोरोनाबाधित रुग्ण हे फक्त सात राज्यात आहेत. तर, देशातील एकूण बळींपैकी 94 टक्के बळी हे फक्त 8 राज्यात झाल्याची नोंद झाली आहे.

देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, या विषाणूचा प्रसार हा काही राज्यांमध्ये जास्त प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे. तर, काही राज्यांनी हा संसर्ग रोखण्यात यश मिळवल्याचे आकडेवारीवरुन पाहायला मिळत आहे.

राज्यांनुसार रुग्णांची संख्या

महाराष्ट्रात – 67 हजार 655
तामिळनाडू – 22 हजार 333
दिल्ली – 19 हजार 844
गुजरात – 16 हजार 779
राजस्थान – 8 हजार 831
मध्यप्रदेश – 8 हजार 89
उत्तरप्रदेश – 7 हजार 823

याचाच अर्थ देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी तब्बल 67.71 टक्के बाधित हे महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश या सात राज्यात आहेत. देशाच्या रुग्णसंख्येत एकट्या महाराष्ट्राचा वाटा 35.50 टक्के आहे. तर मुंबईचा वाटा 20.82 टक्के आहे.

सकारात्मक बातमी! राज्यात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर वाढला : राजेश टोपे

हीच बाब कोविड मृतांच्याबाबतीतही आहे. 5 हजार 394 मृतांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 2 हजार 286 आणि गुजरातमध्ये 1 हजार 38 असे 3 हजार 324 म्हणजे 61.62 टक्के बळी हे फक्त महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यात गेले आहेत.

महाराष्ट्रात – 2 हजार 286
गुजरात – 1 हजार 38
दिल्ली – 473
मध्यप्रदेश – 350
पश्चिम बंगाल – 317
उत्तरप्रदेश – 213
राजस्थान – 194
तामिळनाडू – 173

तर एकूण बळींमधील 5 हजार 44 म्हणजे तब्बल 93.51 टक्के बळी महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि तामिळनाडू या 8 राज्यात आहेत. त्यातही एकट्या महाराष्ट्राचा वाटा 42.38 टक्के आहे. तर देशातील कोविड बळींपैकी 23.71 टक्के बळी एकट्या मुंबईत गेले आहेत.

लॉकडाऊन वाढला

देशातला लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. 1 जूनपासून 30 जूनपर्यंत महिनाभर हा लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊन 5.0 हा फक्त कंटेनमेंट झोनपुरताच मर्यादित आहे. कंटेनमेंट झोनबाहेरील निर्बंध टप्प्याटप्याने कमी होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे कटेंनमेंट झोन वगळता इतर भागात 8 जूननंतर अटींसह काही गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे.⭕

Previous articleभारताच्या हद्दीत घुसखोरी करणाऱ्या १३ दहशतवाद्यांना कंठस्नान
Next articleभारतीय हद्दीत घुसण्याच्या तयारीत आहे चीन, लडाखजवळ दिसली लढाऊ विमानं
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here