विद्यापीठ परीक्षांवर आज निर्णय? मुखमंत्री घेणार कुलगुरूंची बैठक

0
34

🛑 विद्यापीठ परीक्षांवर आज निर्णय? मुखमंत्री घेणार कुलगुरूंची बैठक 🛑
मुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई ⭕करोनाशी सामना करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर परीक्षांबाबत अनिश्चितता कायम असल्याचे चित्र आहे. विद्यापीठांनी पदवीच्या अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत नेमके काय करावे, याबाबत चर्चा करण्यासाठी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुलगुरूंची बैठक बोलावल्याचे सूत्रांकडून समजते. परीक्षांबाबत निर्णयासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नियुक्त केलेल्या समितीने एक प्रारूप आराखडा तयार केला असून यामध्ये सर्व कुलगुरू परीक्षा घेण्यावर ठाम असल्याचे समजते.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशानुसार राज्यात अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. मात्र करोनाची परिस्थिती नियंत्रणात येण्यास आणखी काही कालावधी लागेल, असे सांगत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आयोगाला पत्र लिहून अंतिम सत्राची परीक्षा रद्द करण्याबाबत विनंती केली. यानंतर विद्यार्थ्यांमधील गोंधळ अधिक वाढला असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. राज्यपालांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सामंत यांना समज देण्याबाबत सांगितले होते. यानंतर सामंत यांनी सोमवारी कुलगुरूंची बैठक बोलावली. या बैठकीत ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असाच निर्णय घेतला जाईल, असे सामंत यांनी स्पष्ट करत एका समितीची स्थापना केली होती. या समितीने आपला अहवाल तयार केला असून परीक्षा घेण्यावर कुलगुरूंचा भर असल्याचे सूत्रांकडून समजते.

हा अहवाल समितीले सरकारकडे आणि राज्यपालांकडे सादर केला आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावल्याचे समजते. परीक्षा न घेण्याचा विचार यापूर्वी सरकारतर्फे मांडण्यात आला होता. त्याला सर्व कुलगुरूंनी विरोध करून तसे झाल्यास विद्यापीठांच्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय नामांकनावर परिणाम होऊ शकतो आणि ते विद्यार्थीहिताचेही नसेल असे मत यामध्ये मांडल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री बैठकीत नेमका कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे…

Previous articleनाशिकमध्ये- बिबट्याचा माणसांवर हल्ला, थरार सीसीटीव्हीत कैद
Next articleलँकडाऊन ५.० ची घोषणा! ३०जूनपर्यंत लँकडाऊन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here