सटाणा तालुक्यात एका तरुणाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या*

0
28

*सटाणा तालुक्यात एका तरुणाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या* *
डांगसौंदाणे,(योगेश्वर बहिरम प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-सटाणा तालुक्यातल्या मोठे साकोडे गावात आज सकाळी एका तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या दोन दिवसापूर्वी याच भागात प्रेमीयुगलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचे प्रकरण ताजे असतानाच आज बुधवारी सकाळी मोठे साकोडे ता.सटाणा येथील तरुण रवींद्र(महादू)यशवंत साबळे वय १८वर्ष याने साकोडे गावाच्या शिवारातील गट नं.७८मध्ये आंब्याच्या झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केली.या घटनेचा पंचनामा डांगसौंदाणे औट पोस्टचे हवालदार जाधव आणि शिरसाठ यांनी केला.यावेळी पोलिस पाटील नंदन देशमुख व सरपंच रामचंद्र बहिरम यांचेसह ग्रामस्थ घटनास्थळावर उपस्थित होते.आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Previous articleस्थलांतरीत मजुरांच्या मदतीला एस.टी, ४ लाखांहून अधिकांना राज्यांच्या सीमेपर्यंत पोहचवले…
Next articleअद्याप शाळा-कॉलेज सुरू करण्यासाठी कोणतीही परवानगी नाही; केंद्रीय गृहमंत्रालयाचे स्पष्टीकरण !
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here