कोरोना पासुन वाचवण्यासाठी ‘होमिओपॅथी’ मोठ यश मिळाले! महिन्यातून ६ दिवस घ्यायचं औषध.

0
36

⭕कोरोना पासुन वाचवण्यासाठी ‘होमिओपॅथी’ मोठ यश मिळाले! महिन्यातून ६ दिवस घ्यायचं औषध.⭕
नवी दिल्ली 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

नवी दिल्ली : वृत्त संस्था – संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरसशी लढ्यासाठी वॅक्सीन तयार करण्यात गुंतले आहे. भारत सुद्धा यामध्ये आहे, परंतु यासोबतच आता भारतात होमियोपॅथीचा सुद्धा या लढाईत वापर केला जात आहे. होमियोपॅथीच्या मदतीने लोकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासह ती मजबूत केली जात आहे, ज्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांना ठिक केले जाऊ शकते, तसेच नवीन रूग्णसुद्धा समोर येणे कमी झाले आहे.

डॉ. जवाहर शाह मागच्या 40 वर्षांपासून मुंबईत होमियोपॅथीची प्रॅक्टिस करत आहेत. डॉ. शाह यांनी जगभरात पसरलेल्या सुमारे 100 होमियोपॅथी डॉक्टर्ससोबत मिळून एक खास सेट ऑफ मेडिसिन (सीके 1 आणि सीके 2) तयार केले आहे.
औषध माणसाच्या शरीरात इम्युनिटी वाढवते, ज्यामुळे कोणताही आजार तुमच्या जवळ येत नाही.

औषधाचे हे पूर्ण किट 22000 पोलीस, 4000 फायर ब्रिगेडचे मेंबर, धारावीत राहणारे 2000 लोकांसह आतापर्यंत एकुण 1 लाखपेक्षा जास्त लोकांना देण्यात आले आहे. हे औषध सायको न्यूरो एन्डॉसरीनवर परिणाम करते. हे औषध आयुष मंत्रालयाने दिलेल्या सूचनांच्या आधारेच तयार केले आहे.

आयुष मंत्रालयाद्वारे प्रमाणित आर्सेनिक एल्गम आणि कॅम्फर एम 1 या औषधांना समाविष्ठ केले आहे, ज्याची मागणी सध्या परदेशात सुद्धा होत आहे. या औषधाची सर्वात चांगली गोष्ट ही आहे की, हे महिन्यात केवळ एक वेळच घ्यायचे आहे, ज्याचा कोर्स 6 दिवसांचा आहे. प्रथम सीके 1 औषध लागोपाठ तीन दिवस घ्यायचे आहे. हे दिवसातून तीन वेळा घ्यायचे आहे. यानंतर सीके 2 चा वापर सुद्धा लागोपाठ तीन दिवस करायचा आहे. हे सुद्धा दिवसातून तीन वेळा घ्यायचे आहे. अशाप्रकारे एक महीन्यात या औषधाचा कोर्स 6 दिवसांचा आहे.

डॉ. शाह यांचा दावा आहे की, आता मोठ्या संख्येने लोक एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जात आहेत, तेव्हा त्यांना हे औषध देण्यात यावे. यामुळे कोरोना व्हायरसचा धोका कमी होईल. या औषधाचा खर्च सुद्धा 15 ते 20 रुपयांपेक्षा जास्त नाही.

डॉ. शाह यांच्यानुसार भारतात अशा लोकांची संख्या भरपूर आहे ज्यांच्यामध्ये कोणतेही लक्षण दिसत नाही, परंतु ते कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तसेच कोरोना व्हायरसने मरणार्‍यांचा आकडाही कमी आहे. लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे औषध महत्वाचे आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, आयुष मंत्रालयाच्या आदेशावरच आयुर्वेद आणि होमियोपॅथीशी संबंधित डॉक्टर सेवा करत आहेत, ज्यासाठी आम्ही अशा सुमारे 10 डॉक्टर्सचा एक टास्क फोर्स बनवला आहे. आम्हाला हे देखील समजले आहे की, होमियोपॅथीने आम्हाला चांगला रिझल्ट मिळत आहे.

डॉ. शाह त्या टास्

Previous articleमुख्यमंत्रीविरुध्द वादग्रस्त पोस्ट ! वणीत शिवसैनिकांकडून तोडफोड!
Next articleरोगराई वाढणार नाही याची काळजी घ्या : “मुख्यमंत्री.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here