पुण्यात लष्कराच्या जवानाचे पत्नीवर चाकूने केले सपासप वार

0
42

⭕पुण्यात लष्कराच्या जवानाचे पत्नीवर चाकूने केले सपासप वार⭕
पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

पुणे : – पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात रजेवर आलेल्या लष्कर जवानांने कौटुंबिक वादातून पत्नीवर चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर जवनाने स्वतः गळ्यावर वारकरून घेत आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला आहे.

मोहिनी रोहीत मोरे (वय ३०) असे जखमी झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर रोहीत मोरे (३२) हे देखील किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या दोन खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे.

रोहीत हे लष्करात असून, ते एका महिन्याच्या सुट्टीवर आले होते. रात्री रोहीत याने पत्नीवर चाकूने वार केले.
तसेच तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वतः गळ्यावर चाकूने वारकरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. नेमके वाद का झाले याचा तपास करण्यात येत आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे, असे परिमंडळ चारचे उपायुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान घरघुती वाद झाले असावे. त्यातून हा प्रकार घडला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Previous articleमालेगांवचा उदयोन्मुख उगवता तारा ,सामाजिक कार्यातला संजय महाले पाटील हिरा
Next articleराज्याचे बांधकाम मंत्री व कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण पुढील उपचारासाठी नांदेडहुन मुंबईला रवाना
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here