उमरी तालुक्यातील बालतपस्वी शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून; आरोपी फरार

0
25

*उमरी तालुक्यातील बालतपस्वी शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून; आरोपी फरार*
*नांदेड, दि.२४ ; संजय कोंकेवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज*
*उमरी ( जि.नांदेड ) – तालुक्यातील नागठाणा बु. येथील बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांचा रात्री दीड वाजताच्या सुमारास खून झाला असून या घटनेने भाविकात एकच खळबळ उडाली आहे. गावातीलच एका माथेफिरू तरुणाने महाराजांच्या मठात प्रवेश करून त्यांच्याजवळील ऐवज लुटला त्यानंतर गळा दाबून महाराजांची हत्या केली.*

*महाराजांच्याच गाडीच्या डिकीत टाकुन गाडी घेऊन पळून जाण्याच्या बेतात असताना शेजारील लोक जागे झाले म्हणून या आरोपीने पळ काढला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली. लगेच महाराजांचे प्रेत उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले असून याठिकाणी भाविकांना ही माहिती समजताच एकच खळबळ माजली.*

*नागठाणा बु. येथील मठामध्ये अन्य एकाचा मृतदेह सापडला*

*नागठाणा बु.ता. उमरी येथील ज्या मठामध्ये शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून करण्यात आला त्याच मठातील बाथरूममध्ये अन्य एक मृतदेह सापडला असून मयताचे नाव भगवान शिंदे रा. चिंचाळा ता. उमरी असे असल्याचे समजते. घटनास्थळी उमरी पोलिस रवाना झाले असून याबाबत अधिक माहिती घेण्याचे काम चालू आहे.*

Previous articleउमरी तालुक्यातील बालतपस्वी शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून; आरोपी फरार
Next articleउद्धव ठाकरे यांचा इशारा! गर्दी झाली तर पुन्हा सगळं बंद कराव लागणार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here