देशभरात सोमवारी ईद साजरी केली जाणार! इमाम बुखारींनी केली घोषणा

0
41

⭕ देशभरात सोमवारी ईद साजरी केली जाणार!
इमाम बुखारींनी केली घोषणा⭕
( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

दिल्ली : – देशभरात सोमवारी ईद साजरी केली जाणार आहे. दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम अहमद बुखारी आणि फतेहपुरी मशिदीचे शाही इमाम मुफ्ती मुकर्रम यांनी घोषणा केली आहे की कोठुन पण चंद्र दिसण्याची माहिती मिळाली नाही. त्यामुळे ईद (Eid ul Fitr) ही सोमवारी होणार आहे. व्हायरस आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर इमाम यांनी लोकांना ईद साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. ईद घरी राहूनच साजरी करावी असं सांगण्यात आलं आहे. लॉकडाऊनमध्ये मशिदीत सर्वसामान्य लोकांना जाण्यास बंदी असल्याने काळजी घ्यावी असं देखील सांगण्यात आलं आहे.

Previous articleजिल्ह्यात एकूण 278 पॉझीटिव्ह* *शाहूवाडीत सर्वाधिक 89*
Next articleप्रत्येक तालुक्यासाठी रुग्णवाहिका* *आमदारांची निधीसाठी संमती*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here