नांदेड विभागातुन ०१ जून पासून नांदेड – सचखंड विशेष एक्स्प्रेस धावणार

0
39

*नांदेड विभागातुन ०१ जून पासून नांदेड – सचखंड विशेष एक्स्प्रेस धावणार*
*नांदेड, दि. २२ ; राजेश एन भांगे*
रेल्वे बोर्डाने कळविल्या नुसार आज दिनांक २२ मे २०२० पासून नांदेड विभागातील सहा रेल्वे स्थानकावर रेल्वे आरक्षण केंद्र पुन्हा प्रवाशांकरिता सुरु करण्यात आले आहे. यात नांदेड, पूर्णा, परभणी, सेलू, जालना आणि औरंगाबाद रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
लॉक डाऊन आणि कोरोना मुळे उद्भवलेल्या परिस्थिती मुळे आरक्षण कार्यालयाच्या वेळा पुढील प्रमाणे असतील
सकाळी – ०८.०० ते १२.०० वाजे पर्यंत
दुपारी – १४.०० ते १७.०० वाजे पर्यंत

तसेच रेल्वे बोर्डाने दिनांक ०१ जून २०२० पासून देशभर २०० विशेष गाड्या चालविण्याचे ठरविले आहे. यात नांदेड विभागातून नांदेड-अमृतसर-नांदेड दरम्यान सचखंड विशेष एक्स्प्रेस धावणार आहे.

हि गाडी दिनांक 1 जून रोजी नांदेड येथून गाडी संख्या ०२७१५ नांदेड- अमृतसर विशेष एक्स्प्रेस बनून धावेल. तसेच दिनांक ०३ जून पासून अमृतसर येथून हि गाडी संख्या ०२७१६ अमृतसर-नांदेड सचखंड विशेष एक्स्प्रेस बनून धावेल. या गाडीस २२ डब्बे असतील, यात वातानुकुलीत तसेच बगैर वातानुकुलीत डब्बे असतील. सामान्य म्हणजेच जनरल चे डब्बे नसतील.
या विशेष गाडीच्या वेळा नियमित नांदेड-अमृतसर-नांदेड सचखंड एस्क्प्रेस सारख्याच असतील.

महाराष्ट्र सरकारने ठरवून दिलेल्या कोविड-१९ चे दिशा निर्देशां नुसार महाराष्ट्रातील दोन जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या रेल्वे स्थानका दरम्यान प्रवाशांना या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करता येणार नाही.

या पूर्वीच ठरविल्या नुसार श्रमिक विशेष गाड्यांचे नियोजन संबंधित राज्य सरकार करेल.

प्रवाशांना विनंती आहे कि त्यांनी रेल्वे आरक्षण केंद्रावर / रेल्वे स्थानकावर येतांना तसेच रेल्वे गाडीत प्रवास करतांना भारत सरकारने तसेच संबंधित राज्य सरकारने कोरोना (कोविड-१९) चा प्रसार रोखण्या करिता दिलेल्या दिशा निर्देशांचे पूर्ण पालन करावे. तसेच ते ज्या राज्यात प्रवासाने पोहोचतील त्या सम्बन्धित राज्याच्या कोरोना (कोविड-१९) चा प्रसार रोखण्या करिता दिलेल्या दिशा निर्देशांचे पूर्ण पालन करावे.

विशेष गाड्यांमध्ये प्रवेश करण्या पूर्वी प्रवाशांची शारीरिक तपासणी करण्यात येणार नाही. ज्या प्रवाशांना कोरोना ( कोविड-19) चे कोणतेही लक्षण नसेल त्यांनाच या रेल्वे गाड्यांत प्रवेश दिला जाणार आहे याची प्रवाशांनी कृपया नोंद घ्यावी. रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे.

Previous articleकाल नाशिक शहरात आढळलेल्या 12 कोरोना बाधित रुग्णांची थोडक्यात माहिती
Next articleशेतकऱ्यांचा संपुर्ण कापूस लवकरात लवकर खरेदी करावे ; वसंत सुगावे पाटील
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here