पुणे शहरातील गिरीजा कट्टा (हॉटेल गिरीजा, टिळक रस्ता) येथे गेल्या ५२ दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या सेवापर्वाची सांगता आज झाली

0
29

पुणे शहरातील गिरीजा कट्टा (हॉटेल गिरीजा, टिळक रस्ता) येथे गेल्या ५२ दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या सेवापर्वाची सांगता आज झाली
पुणे : ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

श्री. उदयजी जोशी आणि श्री. चंद्रकांत (भाऊ) सणस यांच्या अथक परिश्रमातून आणि नियोजनातून, तसेच असंख्य मदतीच्या हातांनी गेली ५२ दिवस १ लाख ०२ हजार पेक्षा जास्त जेवणाच्या डब्ब्यांची सोय करण्यात आली. पुणे महापालिकेच्या निवारा केंद्रात आणि गरजूंना दोन्ही वेळचे जेवण पुरविले जात होते.

कोरोनाच्या संकटाच्या काळात या कम्युनिटी किचनच्या माध्यमातून झालेली ही मदत अतुलनीय अशीच म्हणावी लागेल. आज माझ्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शेवटचे डबे वितरीत करण्यात आले. खरं तर हा शेवट नाही, तर एका टप्प्याची समाप्ती म्हणावी लागेल. या सेवापर्वाला पुणेकरांकडून सलाम !

समारोपावेळी उपमहापौर सौ. सरस्वतीताई शेडगे, स्थायीचे अध्यक्ष श्री. हेमंतजी रासणे, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. विद्याधरजी अनासकर, महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्री. परागजी करंदीकर, प्रांताधिकारी श्री. संदेशजी शिर्के, दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्री. देविदास गेवारे यांच्यासह पत्रकार बांधव आणि कट्ट्याचे सदस्य उपस्थित होते.

Previous articleमुंबईतील वानखेडे स्टेडियम आपत्कालीन सेवेसाठी ⭕
Next articleपिंपरी चिंचवडमध्ये दीड महिन्याच्या चिमुकल्यासह चार वर्षाच्या बाळाची कोरोनावर मात
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here