नववर्षाच्या पर्वावर आमदार डॉक्टर देवरावजी होळी भरविणार जनता तक्रार दरबार

0
27

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220113-WA0030.jpg

नववर्षाच्या पर्वावर आमदार डॉक्टर देवरावजी होळी भरविणार जनता तक्रार दरबार

जनतेच्या तक्रारी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी या तक्रार दरबाराचे आयोजन

प्रत्येक सोमवार गडचिरोली, १ ला २ रा व तिसरा गुरुवार चामोर्शी तर शेवटचा गुरुवार धानोरा येथे दुपारी 12 ते 3 वाजता होणार हा जनता तक्रार दरबारजनतेने आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी या जनता तक्रार दरबारात यावे.

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी २०२२ या नवीन वर्षाच्या शुभपर्वावर गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी जनता तक्रार दरबार भरविण्याचा संकल्प केलेला आहे. महिन्याच्या प्रत्येक सोमवारला गडचिरोली, १ ला २ रा व तिसरा गुरुवार चामोर्शी तर शेवटचा गुरुवार धानोरा येथे दुपारी १२ ते ३ वाजता जनता तक्रार दरबार भरणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी दिली आहे.

गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम नक्षलग्रस्त आहे. आपल्या समस्या घेवून जिल्ह्यातील दुर्गम भागातून आलेल्या लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तालुका व जिल्हा केंद्रावर आपल्या कामासाठी त्यांना वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. त्यामुळे जनतेच्या लहान-मोठ्या कामासाठी येणार्‍या अडचणी दूर व्हाव्यात याकरिता आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये जनता तक्रार दरबार भरविण्याचा संकल्प केला आहे.
महिन्याच्या प्रत्येक सोमवारला गडचिरोली, १ ला २ रा व तिसरा गुरुवार चामोर्शी तर शेवटचा गुरुवार धानोरा येथे दुपारी 12 ते 3 वाजता होणार या जनता तक्रार दरबाराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी दिली आहे.

Previous articleखास. अशोक नेते यांचा धानोरा येथे जनसंपर्क दौरा
Next articleशिवर येथे राष्ट्रामाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here