देगलूर तालुक्यातील मौजे वझर येथे जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात साजरा.

0
62

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220112-WA0094.jpg

देगलूर तालुक्यातील मौजे वझर येथे जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात साजरा.
नांदेड,(मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
आज वझर येथे 12 जानेवारी जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. स्वराज्याची जननी माता स्वराज्याचे भलं हो म्हणून एक नाही दोन पुत्र या महाराष्ट्राला लाभले हे आमचं पुण्य आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरांमध्ये जिजाऊ जन्माला आल्या पाहिजे त्यांचे विचार आणि त्यांचे कर्तृत्व आपण समजून घेऊन चालायचे आहे. छत्रपती शिवरायांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची आज जयंती शौर्य आणि धैर्य अशा गुणांचा वारसा त्यांनी महाराष्ट्राला दिला. दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण ग्रामपंचायत वझर जिजाऊ जन्मोत्सव कार्यक्रम पार पाडण्यात आला. जिजाऊंच्या चरणी त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिवप्रेमी उपस्थित होते ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील व तसेच माधव खरात, लक्ष्मण बेंबरे संभाजी ब्रिगेड देगलूर तालुका उपाध्यक्ष, ज्ञानेश्वर भाऊ वजिरे युवा उद्योजक, बळीराम कुडले, राहुल कुडले, नामदेव वजिरे, बाळू संगेकर, कपिल बेम्बरे, श्याम कुडले , बालाजी डावरेगावे तानाजी बेम्बरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here