छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अतिक्रमण हटवा अन्यथा आंदोलन

0
155

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220112-WA0019.jpg

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अतिक्रमण हटवा अन्यथा आंदोलन

संभाजी ब्रिगेडचा उपोषणाचा प्रशासनाला इशारा

परभणी,(शत्रुघ्न काकडे पाटील ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मागील काही दिवसांपासून अतिक्रमणात वाढ झाली असून परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे शिवाय पुतळा परिसरात लावण्यात आलेल्या सिडीमुळे पुतळ्याचे पावित्र्य धोक्यात आले आहे म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रशासनाला दोन वेळा निवेदन देऊन सिडी व अतिक्रमण हटवण्याची मागणी करण्यात आली होती मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असल्याने पुन्हा दिनांक 11 जानेवारी रोजी निवेदन देऊन 14 जानेवारी पर्यंत अतिक्रमन व सिडी हटवली नाही तर उपोषण करणार असल्याचे सांगितले आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मागील काही दिवसांपासून हातगाडी,पानपट्टी व आजूबाजूच्या व्यावसायिकाने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण केले आहेत परिणामी आधीच रस्ता अरुंद त्याच अतिक्रमण यामुळे महिला नागरिकांना तसेच विद्यार्थी विद्यार्थिनीना त्रास सहन करावा लागत आहेत त्याच हातगाडी वाले रस्त्यावर आपला व्यवसाय करून जागेवर घाण टाकून निघून जात असल्यामुळे पुतळा परिसराचे पावित्र्य धोक्यात आले आहे शिवाय पुतळा परिसरात बसवण्यात आलेल्या सिडीमुळे विटंबना होण्याची शक्यता नाकारता येत नाही पुतळ्याचे व सिडीचे अंतर योग्य नसल्यामुळे या अगोदर दोन वेळेस सिडीवर चढून पुतळा विटंबना करण्याचा प्रयत्न झालेला आहे यातच 11 जानेवारी रोजी अनोळखी नागरिकाने सिडीवर चढून पुतळ्यावर पाय देण्याचा प्रकार घडला आहे अशावेळी संभाजी ब्रिगेडने योग्य भूमिका घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे वेळोवेळी नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाला कळूनही कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नसल्यामुळे प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे म्हणून येत्या दोन ते तीन दिवसात पुतळा परिसरातील अतिक्रमण व सिडी हटवली नाही तर 14 जानेवारी पासून लोकशाही मार्गाने उपोषणास बसणार असल्याचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आले आहे या निवेदनावर बालाजी शिंदे सोसकर, माजी सैनिक बालाजी शिंदे,बाळासाहेब काजळे,पिंटू रोकडे,दत्ता भोंबे,उद्धव भोंबे,
,रामा तीर्थे,कैलास जाधव,उद्धव विठ्ठलराव आदींच्या सह्या आहेत

Previous articleराजमाता जिजाऊ जिजाबाई शहाजीराजे भोसले
Next articleमुंबई बंगलोर महामार्गावरील नवले पूलचा परिसर पुणेकरांसाठी मृत्यूचा सापळा ;
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here