महावितरणच्या वतीने थकीत वीज बिल वसुलीसाठी आजपासून परभणी जिल्ह्यात “हर घर दस्तक”मोहिम राबविण्यात येणार

0
115

राजेंद्र पाटील राऊत

20220110_075200.jpg

परभणी,(शत्रुघ्न काकडे पाटील ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

जिल्ह्यात महावितरणचे लघुदाब वर्गवारीतील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वर्गवारीतील १लाख ४७हजार ७१९ विजग्राकांकडे ३५३कोटी ८१लाख रूपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती ग्राहकांकडे ३३४कोटी ५५लाख व्यावसायिकांकडे ७कोटी ३०लाख तर औद्योगिक ग्राहकांकडे १२कोटी ४६ लाख रुपयांची रुपयांची थकबाकी आहे.
यात सर्वात जास्त थकबाकी हि परभणी तालुक्यात असुन ती ८५कोटी २५ लाख रुपयांची आहे.
जिंतूर -८०कोटी २५ लाख, सेलु-४५कोटी ६ लाख, पुर्णा-४० कोटी १ लाख, पाथरी-३९ कोटी २९ लाख,मानवत -२६कोटी ७९लाख , सोनपेठ-१४ कोटी ४५ लाख , गंगाखेड-१४ कोटी २२ लाख तर पालम-८ कोटी ५० लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी “हर घर दस्तक”मोहिम राबविण्यात येत आहे. सोमवार पासुन या मोहिमेस प्रारंभ होणार आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक विजग्राहकाच्या घरोघरी जाऊन बिल भरले कि नाही याची पडताळणी केली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यात ११९ पथके तयार करण्यात आली असून या मोहिमेत वरीष्ठ अधिकार्यासोबतच अभियंते, तांत्रिक कर्मचार्यासह महावितरणचे विविध संवर्गातील ४५१ कर्मचारी सहभागी होणार आहेत. या मोहिमेत विजबिल भरण्यास प्रतिसाद न देणार्या विज ग्राहकांचा विजपुरवठा तडकाफडकी खंडीत केला जाणार आहे.
विज ग्राहकांणी आपले विज बिल भरुन या मोहिमेस सकारात्मक प्रतिसाद द्यावा ,अन्यथा नाईलाजास्तव विज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी लागेल. असा इशारा महावितरणने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here