डांगसौंदाणेत अवतरला दाऊद….! पोलिस प्रशासनापुढे मोठेच आव्हान!! “सट्टा जुगाराचा खेळ मांडीयेला…”

0
173

राजेंद्र पाटील राऊत

20220109_173914.jpg

डांगसौंदाणेत अवतरला दाऊद….!
पोलिस प्रशासनापुढे मोठेच आव्हान!!
“सट्टा जुगाराचा खेळ मांडीयेला…”
(युवा मराठा न्युज नेटवर्क ब्युरो टिम)
डांगसौंदाणे- शासनाची कुठलीही मान्यता नसलेला कल्याण,मुंबई वरळी नावाचा सट्टा मटका आदिवासी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम भागातल्या डांगसौंदाणे येथे “दाऊद” नामक व्यक्तीने सुरु करुन मोठेच थैमान मांडले आहे.मात्र या प्रकाराकडे सटाणा पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष झालेले असून,त्यामुळे सट्टा मटकाकिंग दाऊद मात्र जोमात असल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून कळते.
वास्तविक डांगसौंदाणे हे गांव सटाणा तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असून,राजकारणात देखील अग्रेसर म्हणून या गावाची ओळख आहे अशा या गावात औट पोलिस स्टेशन (बीट) असल्याचीही माहिती मिळत आहे.तरीदेखील पोलिस प्रशासनाला न जुमानता दाऊद सट्टाकिंगचा धुमाकूळ बिनधास्तपणे सुरु आहे.दाऊद काही दिवसापुर्वी देवळा व चांदवड तालुक्याच्या सीमारेषेवर असलेल्या भाबडबारीत आपला सट्टा मटका अवैध धंद्याचा खेळ चालवित होता,आता मात्र थेट डांगसौंदाणे गावाच्या हद्दीतच पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून “खेळ मांडीयेला” या प्रमाणे बिनधास्तपणे या भागातल्या गोरगरीब आदिवासी बांधवाच्या संसाराची राखरांगोळी करुन जुगार अड्डा मात्र तेजीत सुरु असल्याची माहिती प्राप्त होत आहे.या जुगार अड्डयामुळे शेतकऱ्यांना मोलमजूर देखील वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांत देखील दाऊदच्या या अवैध धंद्याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.दाऊदचा इतिहास एकेकाळी नाशिक जिल्ह्यात सट्टा मटका जुगाराचा बेताज बादशहा म्हणून नावलौकिक मिळविलेला हा दाऊद सुरुवातीच्या काळात नाशिक शहरातल्या व्दारका परिसरात सट्टा मटका अवैध धंद्याची सुत्रे चालवायचा तर याच दाऊदच्या हाताखाली तरबेज झालेली सट्टा मटका अवैध धंद्यातील बहुतांश माफीयांची टोळी आज जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात आपले अवैध उद्योग चालवित आहेत.मात्र पोलिस प्रशासन या अशा आयाबहिणींचा संसार उध्वस्त करणाऱ्या जुगार अड्डयावर कठोरपणे व ठोस कारवाई का करीत नाहीत असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

Previous articleबच्चुभाऊ कडू यांच्या प्रहारने एका विधवा भगिनीला घर बांधून दिला आधार
Next articleआ.जितेश अंतापुरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here