बच्चुभाऊ कडू यांच्या प्रहारने एका विधवा भगिनीला घर बांधून दिला आधार

0
113

राजेंद्र पाटील राऊत

20220108_211524.jpg

दौंड तालुका प्रतिनिधी, आकाश लगड युवा मराठा न्युज                          बच्चुभाऊ कडू यांच्या प्रहारने
एका विधवा भगिनीला घर बांधून दिला आधार

आदरणीय राज्‍यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून तसेच आपल्या सर्वांच्या सहकार्याने गौरी सुमित कांबळे रा .रावणगांव या विधवा भगिनीला एक छोटसं घर बांधून देवून आधार दिला .

गौरीचे पती सुमीत कांबळे यांचे जून महिन्यात गौरीच्या बाळ पोटात असताना आजार पणाने दुःखद निधन झाले होते .
३ मुली आणि १ महिन्याचा मुलगा ,सासरी परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आणि पती गेल्या मुळे आधार गेला . गौरी आपल्या ४ लहान बाळांना घेवून ती आपल्या आई कडे राजेगाव मध्ये आली .
अगोदरचं वडिलाचे छत्र हरविले आहे . त्यातच पतीचं निधन झालं.
तिची आई व छोटा भाऊ छोटया पत्र्याच्या घरामध्ये राहतात त्यातच गौरी आपल्या ४ मुलासह आई कडे राहण्यासाठीआल्यामुळे घर तोकडे पडू लागले होते .
गौरीची आजी माझ्याकडे आली आणि काही तरी या गरीब मुलीला मदत करा . असे म्हटल्यावर मी छोटसं घर बांधून देतो असा आधार दिला .
समाजातील काही दानशुरांनीही मदत केली . निवारा म्हणून छोटसं घर बांधून देवून गौरीला जगण्याची नवी उमेद दिली . या छोट्याशा घरासाठी
विलास ढवळे ,लालासाहेब गावडे ,तुकाराम लांवढ,विलास वरे ,सचिन माने ,महेश पानसरे, रामभाऊ शेंद्रे , विजय आटोळे , निलेश भोसले , विठ्ठल थोरात ,ब्रम्हादेव कुंभार ,आंनद जगताप ,नवनाथ काळे, तुषार ढवाण ,सोममाथ कांबळे या सर्वांनी गोरी कांबळे या भगिनीला घर बांधण्यासाठी आर्थिक स्वरूपात हातभार लावून सहकार्य केले .

आज प्रहार जनशक्ती पक्ष पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गौरीला घराची चावी सुपूर्द केली. तसेच प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने गौरीच्या कुटुंबासाठी जीवनावश्यक वस्तूंचे कीट दिले .

या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अनंत काळे , राजेगांवच्या उपसरपंच सीमा शितोळे – देशमुख , दौंड तालुका उपाध्यक्ष रफिक सय्यद,उपाध्यक्ष शंकर काळे,पुणे शहर चिटणीस संदीप नवले ,पुणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब तावरे ,कामगार आघाडी शहराध्यक्ष आनंद जगताप ,चिटणीस राहुल शेलार ,नवनिर्वाचित प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा शबाना मुलानी ,गणेश वाघमारे ,भरत मोरे , निळकंठ खंडागळे , मुस्ताफ मुलाणी ,अक्षय नांगरे ‘सुनील धाकतोडे , राजाभाऊ गायकवाड उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here