नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे वा नगरसेविका शितल नाना काटे यांच्या पाठपुराव्याने काम पूर्ण

0
49

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220105-WA0028.jpg

नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे वा नगरसेविका शितल नाना काटे यांच्या पाठपुराव्याने काम पूर्ण

पिंपरी, चिंचवड/उमेश पाटील प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क
– साई चौक जगताप डेअरी येथील छत्रपती संभाजी महाराज ग्रेड सेपरेटरचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले.
आज दि. ०५ जानेवारी २०२२ रोजी प्रभाग 28 रहाटणी – पिंपळे सदागर येथील जगताप डेअरी साई चौक येथील वाकड वरून पिंपळे सौदागरला येणाऱ्या ग्रेड सेपरेटरचे आज पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्री संजोग वाघेरे पाटील मा. विरोधी पक्षनेते विद्यमान नगरसेवक श्री विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते फीत कापून नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करण्यात आला . यावेळी नगरसेवक मयुर कलाटे नगरसेविका शितल नाना काटे, सागर कोकणे,उद्योजक शिरीष साठे, सुमित डोळस, गौरव शितोळे, उत्तम धनवटे आदी उपस्थित गौरव शितोळे, उत्तम धनवटे आदी उपस्थित होते.गेल्या अनेक वर्षापासून नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे वा नगरसेविका शितल नाना काटे यांच्या पाठपुराव्याने या ग्रेड सेपरेटर चे काम पूर्ण करण्यात आले.या ग्रेड सेपरेटरमुळे आता या ठिकाणी होणारी वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न पूर्णपणे सुटणार आहे .विशेषतः पिंपळे सौदागरहून आयटी पार्क हिंजवडीला जाणाऱ्या नागरिकांना पूर्वी सारखी वाहतूक कोंडीची समस्या भासणार नाही त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here