रायगड किल्ला रायगड रोपवे व परिसर पाच दिवस पर्यटकांसाठी बंद, राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी 🛑

0
244

राजेंद्र पाटील राऊत

20211202_082813.jpg

🛑 रायगड किल्ला रायगड रोपवे व परिसर पाच दिवस पर्यटकांसाठी बंद, राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी 🛑
✍️ महाड : विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज

रायगड/महाड ⭕राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या रायगड किल्ला दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितेचा कारणास्तव रायगड किल्ला, रायगड रोपवे व परिसर पर्यटकांसाठी 3 डिसेंबर ते सात डिसेंबर या कालावधीमध्ये बंद ठेवण्यात येणार आहे.

पोलीस अधीक्षक जनसंपर्क कार्यालयाकडून यासंदर्भातील प्रसिद्ध पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सात डिसेंबरला छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी रायगड किल्ल्या वरती येणार आहेत .

राष्ट्रपतींच्या यादरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था असल्याने रायगड किल्ला ३ डिसेंबर ते ७ डिसेंबर २०२१ या पाच दिवसांच्या कालावधीत करता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे .रायगड किल्ल्या बरोबरच रायगड वर जाण्यासाठी सुविधा पुरवणारा रोपवे देखील पर्यटकांसाठी या कालावधीत बंद राहणार आहे. रायगड किल्ल्या बरोबरच रायगडच्या आजूबाजूचा परिसरात देखील पर्यटकांसाठी प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे .रायगड किल्ल्या वरती जाण्यासाठी महाड नाते खिंड ते पाचाड तसेच माणगाव इथून जाणारा माणगाव ,घेरोशी वाडी मार्गे पाचाड हे दोन रस्ते पर्यटक वापरत असतात. राष्ट्रपतीच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव या दोन रस्त्यांवरील वाहतूक देखील पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे. या कालावधीमध्ये रायगडावर येणाऱ्या पर्यटकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून आगाऊ सूचना पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

राष्ट्रपतींच्या या दौऱ्यामुळे पर्यटकांना मात्र रायगड पासून पाच दिवस दूर राहावे लागणार आहे.

Previous articleनेते मंडळी जोमात शेतकरी मात्र कोमात
Next articleउंद्री प.दे. येथे तीन दिवसीय श्री खंडोबा यात्रा महोत्सव शनिवारी पालखी सोहळा तर रविवारी जंगी कुस्त्याचा फड.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here