भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी आशा प्रशांत नाकाडे यांची निवड जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे यांनी केली घोषणा

0
40

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20211128-WA0045.jpg

भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी आशा प्रशांत नाकाडे यांची निवड

जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे यांनी केली घोषणा

गडचिरोली :(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेऊन पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या कुटुंबांतील सदस्यांचा भाजपाने नेहमीच सन्मान केला आहे. पक्ष संघटना वाढीसाठी म्हणून देसाईगंज तालुक्यातील विसोरा येथिल सुप्रसिद्ध असलेल्या प्रशांत नाकाडे यांच्या अर्धांगिनी आशा नाकाडे यांची भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्ष म्हणून भाजपा प्रदेशच्या मार्गदर्शनात निवड करण्यात आली आहे.
भाजप जिल्ह्यात वाढविण्यासाठी काम करणाऱ्या सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार आशा प्रशांत नाकाडे यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवड भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे यांनी केली आहे. या निवडीचे श्रेय विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर ,खासदार अशोकजी नेते, आमदार डॉ.रामदासजी आंबटकर, , आमदार डॉ. देवरावजी होळी, आमदार कृष्णाजी गजबे यांना दिले आहे.
या निवडीबद्दल भाजपाचे जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, प्रशांतजी वाघरे, रविंद्रजी ओल्लालवार, प्रमोदजी पिपरे, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सभापती प्रा. रमेशजी बारसागडे, प्रदेश सदस्य किसान मोर्चा रमेशजी भुरसे, प्रदेश महामंत्री आदिवासीं मोर्चा प्रकाशजी गेडाम, महीला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा सौ योगिता ताई भांडेकर, ओबीसी नेते प्रणयभाऊ खुणे, अनील पोहनकर, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष सौ योगिता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, देसाईगंज नगराध्यक्ष शालूताई दंडवते, उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, आदींनी अभिनंदन केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here