उक्षी ग्रामपंचायत मालकीच्या २३ नंबर ला नोंद असलेल्या रस्त्यावरील अनधिकृत बांध हटवण्यासाठी उपोषण

0
56

राजेंद्र पाटील राऊत

20211112_064711.jpg

उक्षी ग्रामपंचायत मालकीच्या २३ नंबर ला नोंद असलेल्या रस्त्यावरील अनधिकृत बांध हटवण्यासाठी उपोषण

युवा मराठा न्युज नेटवर्क, चँनल l रत्नागिरी I ११ नोव्हेंबर
ब्युरो चिफ – सुनिल अनंत धावडे

 

सामाजिक कार्यकर्ते संदेश जोशी व रमजान गोलंदाज उपोषणास सुरवात

रत्नागिरी तालुक्यातील उक्षी ग्रामपंचायत नमुना २३ ला नोंद असणाऱ्या रस्त्यावर अतिक्रम हटवण्यासाठी आज पासून ग्रामपंचायत उक्षी विरोधात रमजान गोलंदाज व संदेश जोशी यांचे उपोषण ग्रामपंचायत उक्षी येथे सुरु झाले आहे.

बनाचीवाडी मुख्य रस्ता ते चिंचवाडी फाटा पासून दीपक भोसले यांच्या बागेत जाणारा रस्ता अशी ग्रामपंचायत नमुना क्रमांक २३ नोंद असताना.काही लोकांनी त्या ग्रामपंचायत मालिकीच्या रस्त्यावर बांध घालून ग्रामपंचायतचा रस्ता बंद केला असून त्यासाठी नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत सदरील रस्ता ग्रामपंचायतनी तत्काळ खुला करण्याचा ठराव झाला, ग्रामपंचायत मध्ये अनेक विनवण्या आणि अर्ज करण्यात आले मात्र ग्रामपंचायतकडून कोणतीच दखल घेतली गेली नसल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला असल्याचे मत उपोषण कर्त्यांनी मांडले.

ग्रामपंचायत उक्षीचे कारभारी कोणतिच दखल घेत नसल्याने आणि सध्या अर्जाचे उत्तर देत नसल्याने निषेध व्यक्त केला गेला आहे.

गटविकास अधिकारी रत्नागिरी यांचा नियम बाह्य आदेश

रत्नागिरी तालुक्यातील उक्षी गावात नोटरीच्या आधारे संमतीपत्र घेऊन ग्रामपंचायत २३ला नोंद करण्यात आली. नंतर संमती देणाऱ्यांनी पुन्हा नोटरी करून २३ नंबरला असलेली नोंद रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यावर गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत २३ नंबर नोंद करताना नोटरी ग्राहाय्य धरता येत नाही असे सांगितले. जर नोटरी रद्द करायची असेल तर त्यासाठी संबंधित व्यक्तींना कोर्टात जावे लागेल अशी आमच्या अभ्यासा प्रमाणे माहिती आहे. जेव्हा कोर्ट आदेश देईल त्यावर नोटरी रद्द होईल आणि नोटरी करताना त्याचे कारण कोर्टात द्यावे लागेल. जेव्हा कोर्ट आदेश देईल तेव्हाच २३ नंबरची नोंद रद्द करता येईल. अशी आमची माहिती आहे.

जो पर्यत नोद आहेत तो पर्यत ग्रामपंचायत मालक आहे मग बांध हटवायला ग्रामपंचायत कां घाबरते असा सवाल उपस्थिती होत आहे.

Previous articleकोल्हापूर जिल्ह्यातील एवढ्या एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन
Next articleरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बागलाण चा एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपास जाहीर पाठिंबा 
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here