सत्ताधारी गटातील नगरसेवकाचा सभात्याग.

0
956

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20211110-WA0036.jpg

सत्ताधारी गटातील नगरसेवकाचा सभात्याग.

कोल्हापूर  (राहूल शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क ) वडगाव शहर विकास आराखडा संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीतून सत्ताधारी गटातील नगरसेवक संदीप पाटील यांनी सभात्याग केला विरोधी पक्ष नेत्या विद्याताई पोळ यांनी यांनी सुद्धा सभात्याग केला. या सभात्याग नाट्यानंतर ही सभा झाली. यावेळी टीपीए विभागाने विकास आराखड्याचे सादरीकरण करून सीलबंद अहवाल नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांच्याकडे सुपूर्द केला. आराखड्याचे सादरीकरण टीपीए विभाग करणार आहे तो मंजूर करणे नामंजूर करणे आपल्याकडे आहे या सादरीकरणासाठी थांबावे अशी विनंती नगराध्यक्ष माळी यांनी केली. यावेळी विद्या पोळ यांनी विकास आराखडा सादर करताना सर्वांना विश्वासात घेऊन तो करावा. पत्रकारांना का बोलवलेले नाही? यामध्ये पारदर्शकता पाहिजे असे सांगून त्यांनी सभात्याग केला. मागील सहा महिन्यापूर्वी सुद्धा यासाठीच सत्ताधारी गटातील नगरसेवक संदीप पाटील यांनी सुद्धा सभात्याग केला व आज सुद्धा सभात्याग केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here