अण्णांच्या हातात भाजपचे कमळ… ? राज्यपाल कोश्यारी अण्णा हजारे यांचे केले कौतुक, पंतप्रधान नरेंद्र मोदींना दाखवला विकासाचा रस्ता.?

0
41

राजेंद्र पाटील राऊत

20211028_204303.jpg

अण्णांच्या हातात भाजपचे कमळ… ?
राज्यपाल कोश्यारी अण्णा हजारे यांचे केले कौतुक, पंतप्रधान नरेंद्र मोदींना दाखवला विकासाचा रस्ता.?

ठाणे (अंकुश पवार/सहसंपादक,ठाणे/युवा मराठा वेब न्युज चॅनेल)

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी हे अहमदनगर जिल्ह्यात दोन दिवसीय दौऱ्या निमित्त आले होते. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी हिवरेबाजार व राळेगण सिद्धी या दोन आदर्शगावांना भेटी देऊन तेथील कामाची माहिती जाणून घेतली.
कोश्यारी यांनी राळेगणसिद्धी येथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या समवेत विकासकामांची पाहणी केली. यावेळी राज्यपालांनी हजारे यांनी त्यांच्या गावी येण्याचे निमंत्रण दिले. गावी येणे शक्य नसेल तर मुंबई येथील राजभवनात काही तरूण गावकऱ्यांना घेऊन येण्याचे निमंत्रण दिले.

या प्रसंगी ग्रामस्थांशी संवाद साधताना कोश्यारी म्हणाले, अण्णा हजारे यांनी विकासाचा रस्ता दाखविला. त्याच प्रमाणे आम्हाला अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील विकासाचा रस्ता दाखविला आहे. अण्णा हजारे यांच्या विकासाच्या मार्गाने देशात विकास पर्व सुरू आहे, असे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.

राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणाले, आण्णांना प्रणाम म्हणजे ईश्वराला प्रणाम आहे. आण्णांनी राबविलेला सौर ऊर्जा प्रकल्प आज पंतप्रधान मोदी संपुर्ण देशभरात राबवित आहेत अण्णांनी राळेगणसिद्धीत केलेली विकास कामे ही देशाला दिशादर्शक व मार्गदर्शक आहेत. लवकरच ही सर्व कामे पाहण्यासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री यांच्यासमवेत मी पुन्हा एकदा राळेगणसिद्धीच्या दौऱ्यावर येणार असल्याचे त्यांनी ग्रामस्थांना कबुल केले.

यावेळी राज्यपालांनी येथील पाझर तलाव, गॅबियन बंधारा, ग्रामविकासाचे माहिती केंद्र, अडीच कोटी लिटरचे शेततळे, आजवर आंदोलन केलेल्या माहिती केंद्र अशा विविध ठिकाणांना भेट दिली.
त्यामुळे आता शांत असलेले अण्णा हजारे पुढे कोणाविरोधत आंदोलन करतात हे पाहणे कौतुकाचा विषय आहे.

Previous articleलोकमान्य टिळक जन्मस्थान खुले करण्याची भाजपाची मागणी
Next articleहिंगणी बेर्डी येथील कु.अनिकेत गोरख खैरे यांची दौंड तालुका भारतीय जनता पार्टी (विद्यार्थी आघाडी) उपाध्यक्ष पदी निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here