आरोग्य विभागाच्या भरतीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा? आरोग्य मंत्री राजीनामा द्या, विद्यार्थ्यांचे फी चे पैसे परत करा..

0
99

राजेंद्र पाटील राऊत

20211028_175132.jpg

आरोग्य विभागाच्या भरतीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा? आरोग्य मंत्री राजीनामा द्या, विद्यार्थ्यांचे फी चे पैसे परत करा…

ठाणे (अंकुश पवार,सहसंपादक-ठाणे, युवा मराठा वेब न्युज चॅनेल/साप्ताहिक)

गेल्या वर्षी आरोग्य विभागाने बंपर भरती प्रक्रिया राबवली होती त्यात सुध्दा असाच गोंधळ झाला होता. आता आरोग्य विभागांतर्गत वर्ग ‘क’ आणि ‘ड’ वर्गाच्या परीक्षा घेण्याची जबाबदारी दिल्लीतील न्यासा कम्युनिकेशन्स कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. ही कंपनी निविदा प्रक्रियेतून निवडण्यात आली असून, गेल्या महिन्यात या परीक्षा होणार होत्या. मात्र, गेल्या महिन्यात न्यासाने पुरेशी परीक्षा केंद्रे उपलब्ध करून न दिल्यामुळे ऐनवेळी आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यावेळी परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माफी मागितली होती. त्यानंतर २४ ऑक्टोबर आणि ३१ ऑक्टोबर अशा दोन दिवशी या परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. पुन्हा कोणताही गोंधळ होऊ नये आणि परीक्षा यशस्वी व्हावी, यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह संपूर्ण आरोग्य विभागाने कंबर कसली होती.
२४ ऑक्टोबर ला झालेल्या परीक्षेत झालेला गोंधळ सगळ्यांनी पहिला आहे, वेळेवर प्रश्न पत्रिका दिल्या नाहीत, पेपर फुटले, उमेदवारांना परीक्षा केंद्र ऐन वेळी बदलून दिले, ५०००० अडवांस द्या अशा स्वरूपाची कथित ऑडियो क्लिप पुढे आले.
आता ३१ ऑक्टोंबर ला होणाऱ्या गट ड च्या परीक्षेत एका विद्यार्थ्याला ३३ हॉलतिकीट एकाच सेंटर चे आले आहेत.
याचा पाठपुरावा करण्यासाठी युवा मराठा वेब न्युज चॅनेल चे सहसंपादक,ठाणे अंकुश पवार यांनी स्वतः गट ड चा फॉर्म भरला होता.
आधी परीक्षा एक वेळी रात्री १० वाजता पुढे ढकलली याचा एसएमएस आमच्या प्रतिनिधी यांना आला नव्हता. आता आधी गट क,चे ठाणे,मुंबई, सेंटर फॉर्म मध्ये दिले असताना पुणे हे सेंटर आले होते. आणि आता गट ड साठी सारखीच परीक्षा वेळ,त्याच दिवशी एक सेंटर बारामती,दुसरे सेंटर चेंबूर आले आहे.

टोपे साहेब माझी स्वतःची फी रू १२०० ह्यात मी भरली आहे. आता मी एकतर बारामती किंवा चेंबूर एकच ठिकाणी परीक्षा देऊ शकतो. आता मी बारामती किंवा चेंबूर एका ठिकाणी परीक्षा देऊ शकतो माझी ६०० रुपये कोणाच्या खिशात जाणार? सरकारच्या, नासा कंपनीच्या,की मंत्रांच्या याचा खुलासा नासा कंपनी, आरोग्य मंत्री,ठाकरे सरकार यांनी करावा…

मग एक परीक्षांचे फी चे पैसे कुठे गेले ते मला व माझ्या सारख्या लाखो उमेदवारांना परत मिळणार का?
तुमच्या आरोग्य विभागाच्या गाईड लाईन मध्ये कुठेही एकच सेंटर निवडा असे दिले नव्हते. उलट गट ड साठे सर्व पदे,पुणे,ठाणे,मुंबई विभाग पर्याय उपलब्ध होते, त्यामुळे उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
एकाच दिवशी,एकच वेळी,एकच उमेदवाराची वेगवेगळ्या सेंटर ला परीक्षा सेंटर देणे हे कोणते नियोजन आहे?

टोपे साहेब येत्या लोकसभा निवडणुकीत एकाच मतदाराला दोन ठिकाणी मत देणे चालते का? एकाच उमेदवाराला दोन वेगवेगळ्या वॉर्ड मध्ये उभे करून एकाच दिवशी,एकाच वेळी, दोन्ही ठिकाणी मतदान प्रकिया,प्रचार उमेदवार करू शकतील का?
त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आर्यन खान प्रकरण सोबतच महाराष्ट्रात इतर ही घटना घडतात या कडे लक्ष्य द्यावं, जर असाच गोंधळ पुन्हा गट ड च्या परीक्षेत होणार असेल तर उमेदवारांचे आरोग्य विभागाच्या या कारभारामुळे सेंटर चुकीमुळे झालेल्या नुकसानीची मुळे परीक्षा न देता आल्याने परीक्षा फी परत करावी अन्यथा आंदोलन उभे राहील.

Previous articleआर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील NCB चा पंच किरण गोसावी पुणे क्राईम ब्रॅच च्या ताब्यात
Next articleलोकमान्य टिळक जन्मस्थान खुले करण्याची भाजपाची मागणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here