आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील NCB चा पंच किरण गोसावी पुणे क्राईम ब्रॅच च्या ताब्यात

0
26

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20211028-WA0022.jpg

पुणे : प्रतिनिधी . उमेश पाटील
किरण गोसावी याने आपल्या फेसबुकवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी अशी पोस्ट टाकली होती.
त्याला चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता.
त्यांच्याकडून ३ लाख रुपये घेऊन त्याची फसवणूक किरण गोसावी याने केली होती फरासखाना पोलिसांकडे फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून साक्षीदार करण्यात आलेल्या व पुण्यासह अनेक शहरात फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या किरण गोसावी हा अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कर्मचारी यांनी त्याला आज सकाळी ताब्यात घेण्यात आले आहे किरण गोसावी याने आर्यन खानबरोबरचा फोटो व्हायरल केल्यानंतर तो चर्चेत आला होता.
: फरसाखाना पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस काढली होती.
त्याचा शोधन्यासाठी पथके तयार करण्यात आली होती.
तो लखनौ येथे असल्याची माहिती मिळाल्यावर पुणे पोलिसांचे पथक लखनौला जाऊन धडकले होते.
परंतु, हे पथक पोहचण्यापूर्वीच किरण गोसावी तेथून फरार झाला होता.गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलीस त्याच्या मागावर होते. गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतले असून सध्या त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here