पत्रकार भीमराव पवार यांना चपलेने मारणार, विनयभंगाचा गुन्हा दाखल करणार; भाजपने हाकलून दिलेल्या नगरसेविका सीमा सावळे यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत धमकी

0
59

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20211020-WA0077.jpg

पत्रकार भीमराव पवार यांना चपलेने मारणार, विनयभंगाचा गुन्हा दाखल करणार; भाजपने हाकलून दिलेल्या नगरसेविका सीमा सावळे यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत धमकी
पिंपरी, दि. २० (उमेश पाटील प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) – भाजपने हाकलून दिलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी बुधवारी (दि. २०) सर्वसाधारण सभेत पत्रकारांवर गरळ ओकल्याची बातमी “पिंपरी-चिंचवड टाइम्स ने दिल्यानंतर सभेचे वातावरण तापले. ही बातमी वाचून सीमा सावळे यांनी भर सभेत पत्रकार भीमराव पवार यांना चपलेने मारणार, त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणार असल्याची जाहीर धमकी दिली. याच सीमा सावळे यांनी २०१७ च्या महापालिका निवडणुकीच्या आधी निगडी, सेक्टर क्रमांक २२ येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील घरांसाठी राष्ट्रवादीचे तत्कालीन नगरसेवक तानाजी खाडे यांनी तेथील महिलांकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा अत्यंत गंभीर आरोप केला होता. नंतर या प्रकरणात पुढे काहीच निष्पन्न झाले नाही. याचाच अर्थ सीमा सावळे यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी तमाम महिला वर्गाचाच एकप्रकारे विनयभंग केला होता. त्यामुळे सीमा सावळे यांच्या विरोधातच विनयभंगाचा गुन्हा दाखल
करण्याची मागणी होत आहे.

सर्वसाधारण सभा सुरू झाल्यानंतर महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर तसेच स्मार्ट सिटीच्या कामांवर चर्चा करताना नगरसेविका सीमा सावळे यांनी पत्रकारांवर गरळ ओकली. आमच्यावर लिहिल्यामुळे पत्रकारांचे पोट भरते, माझ्याबाबत पत्रकार जे काही लिहितात तो एक प्रकारचा विनयभंग असल्याचे सांगत पत्रकारांवर भुंकल्या. याबाबत “पिंपरी-चिंचवड टाइम्स”ने बातमी दिल्यानंतर आपले पितळ उघडे पडल्याचा राग आलेल्या सीमा सावळे यांनी भर सभेतच कांगावा करण्यास सुरूवात केली.

हा महिलांचा अपमान असल्याचे सांगत पत्रकार भीमराव पवार यांना चपलेने मारणार, त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणार असल्याची जाहीर धमकी सीमा सावळे यांनी भर सभेत दिली. सीमा सावळे यांच्यासारख्या राजकारण्यांना आपला खरा चेहरा कोणीतरी जनतेसमोर मांडला की सर्व कायदे आपल्या खिशात असल्यासारखे वाटते. त्यातूनच त्यांनी पुन्हा एकदा पत्रकारांवर गरळ ओकली.
दरम्यान, नगरसेविका सीमा सावळे यांनी २०१७ च्या महापालिका निवडणुकीआधी निगडी, सेक्टर क्रमांक २२ येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाबाबत अनेक गंभीर आरोप केले होते. सेक्टर क्रमांक २२ चे तत्कालीन नगरसेवक तानाजी खाडे यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील घरांसाठी तेथील महिलांकडून शरीरसुखाची मागणी केल्याचा अत्यंत गंभीर असा आरोप केला होता. नंतर हा आरोप केवळ राजकीय स्टंटबाजीसाठी केलेला आरोप निघाला. कारण गेल्या चार-पाच वर्षात या प्रकरणात ना तानाजी खाडे यांच्यावर कोणता गुन्हा दाखल झाला, ना त्यांनी ज्या महिलांकडे शरीरसुखाची मागणी केली होती, त्यांपैकी एकाही महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यामुळे नगरसेविका सीमा सावळे यांनी सेक्टर क्रमांक २२ च नव्हे तर शहरातील ज्या ज्या झोपडपट्ट्या आहेत, तेथे राहणाऱ्या सर्व महिलांचा एक प्रकारे विनयभंग केला होता. त्यावरून सीमा सावळे यांना महिलांचा किती कळवळा आहे हे दिसून येते. आता पत्रकारांवर गरळ ओकल्याची स्वतःची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित पत्रकाराविरोधात विनयभंगाची तक्रार करण्याची धमकी देणे म्हणजे सीमा सावळे यांना महिला असल्यामुळे आपण काहीही करू शकतो, असा समज झाल्याचे दिसून येत आहे. परंतु, अशा प्रवृत्तींविरोधात शहरातील महिलांनी एकवटण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

Previous articleमहाविकास आघाडीत – बिघाडी, एक आमदार महापुरूषांच्या पुतळ्याची विटंबना करतात…,तर दुसरे निवडणुकीत मताला ३ हजार वाटले सांगतात….?
Next articleकुणी घर देता का घर! ; टाळेबंदीनंतर बेघरांच्या संख्येत वाढ.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here