महाविकास आघाडीत – बिघाडी, एक आमदार महापुरूषांच्या पुतळ्याची विटंबना करतात…,तर दुसरे निवडणुकीत मताला ३ हजार वाटले सांगतात….?

0
114

राजेंद्र पाटील राऊत

20211019_105205.jpg

महाविकास आघाडीत – बिघाडी, एक आमदार महापुरूषांच्या पुतळ्याची विटंबना करतात…,तर दुसरे निवडणुकीत मताला ३ हजार वाटले सांगतात….?

ठाणे (अंकुश पवार, ठाणे शहर प्रतिनिधी, युवा मराठा न्युज न्युज चॅनेल)

गेल्या ४ दिवसापूर्वी हिंगोली जिल्ह्यात आमदार श्री राजू नवघरे यांनी सार्वजनिक कार्यक्रम मध्ये तमाम महाराष्ट्रातील शिवभक्त,शिवसैनिक,यांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.सार्वजनिक कार्यक्रमास उपस्थित असताना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना महाराजांच्या अश्वावर चडून पुष्पहार अर्पण केला आहे. ते प्रकरण ताजे असताना अजूनही ठाकरे सरकारने काही कारवाई केले नसताना
मताला तीन हजार रुपये देऊन तेव्हा निवडणूक लढली होती, असे सांगत साखर कारखान्याच्या निवडणुकीत कशाप्रकारे पैशांचा महापूर येतो, याचं उदाहरणच शिवसेना आमदाराने दिले आहे.

पंढरपूर येथे साखर कारखाना निवडणूक म्हणजे पैशांचा महापूर असे बोलले जाते. यात खरंच तथ्य आहे हे खुद्द सांगोला मतदारसंघाचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी कबूल केले आहे. १९९८ मध्ये झालेल्या सांगोला सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आपण मताला ३ हजार रुपये प्रमाणे पैसे वाटले, शिवाय मटणाच्या पार्ट्या दिल्या त्या वेगळ्या, असा गोप्यस्फोटच पाटील यांनी केला. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमक्षच आमदार पाटील यांनी हे विधान केले. सांगोला सहकारी साखर कारखाना आता उद्योजक अभिजीत पाटील यांच्या धाराशीव कारखान्याने २५ वर्षांसाठी चालवायला घेतला आहे. या कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी आपल्या भाषणात आमदार पाटील यांनी साखर कारखान्यांच्या निवडणुकीत कशाप्रकारे पैशांचा महापूर येतो हे सांगण्यासाठी स्वत:चेच उदाहरण दिले. १९९८ मध्ये झालेल्या सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत गणपतराव देशमुख यांना शह देण्यासाठी कशाप्रकारे पैसा खर्च केला, याची माहितीच शहाजीबापू पाटील यांनी जाहीरपणे सांगून टाकली.
‘१९९८ मध्ये सांगोला कारखाना निवडणूक लागली आणि गणपतराव देशमुख, माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यासह तालुक्यातील सर्व आघाडीच्या नेत्यांनी पॅनल उभे केले. यात मला स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे मी त्यांच्या विरोधी पॅनल उभे केले. ते मताला २ हजार रुपये देत असल्याचे कळले मग मी मताला ३ हजार रुपये प्रत्येकी देत ५७ लाख रुपये त्यावेळी वाटले. त्याशिवाय मटणाच्या पार्ट्या दिल्या त्या वेगळ्या. इतकं करूनही तेव्हा मी एकटाच निवडून आलो, बाकी पॅनल पडले’,
सांगोला कारखान्यातील निवडणुकीचे राजकारण सांगताना आमदार पाटील यांनी कारखाना १० वर्षे बंद राहिल्याबद्दल खंतही व्यक्त केली. अनेक दिग्गज नेते सांगोला कारखान्याशी जोडले गेले होते. असे असतानाही हा कारखाना १० वर्षे बंद होता हे दुर्देव म्हणावे लागेल. या पापात मीही सहभागी होतो, याचा मला नेहमीत खेद वाटतो, असे सांगत आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांची माफीही मागितली. १९९८ मध्ये सांगोला कारखान्याची निवडणूक झाली तेव्हा शहाजीबापू पाटील काँग्रेसमध्ये होते. जून २०१४ मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला.
आता ह्या आमदार श्री.राजू नवघरे आणि सांगोला मतदारसंघाचे शिवसेना आमदार श्री. शहाजीबापू पाटील यांच्या या वकतव्यामुळे माहाविकास आघाडी मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या येत्या दिवाळी सणा आधीच या पक्षातील आमदारांनी दिवाळी फटाके फोडण्यास सुरुवात केली आहे. आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे त्यांच्याच आमदारांनी फोडलेल्या फटाक्यांमुळे लागलेली आग कारवाई करून विजवतात की पुढे असेच सुरू ठेवतात हे पाहणे कौतुकाचा विषय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here