टेंभुर्णी येथील जळालेल्या ऊसाचा प्रश्न मार्गी…….

0
45

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20211018-WA0072.jpg

टेंभुर्णी येथील जळालेल्या ऊसाचा प्रश्न मार्गी…….
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

टेंभुर्णी परिसरातील शेतकरी श्री कृष्णा हरी देशमुख यांचा 3 एकर 86032 जातीचा आडसाली लागण असणारा ऊस शॉर्टसर्किटमुळे जळाला. तेव्हा या शेतकरी कुटुंबीयांनी टेंभुर्णीचे युवा नेते श्री ऋषीकेश (बंटीनाना) बोबडे यांच्याशी संपर्क साधला. सदरील जळालेल्या ऊसाची माहिती श्री बंटीनाना यांनी माढा तालुक्याचे सभापती युवानेते आदरणीय श्री विक्रमदादा शिंदे यांच्या कानावर घातली. श्री विक्रमदादा यांनी लगेचच कै. वि. शिंदे सह. साखर कारखान्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन ऊस तोडून न्यायला सांगितले. कारखान्यानेही ताबडतोब टेंभुर्णी विभागाचे संबंधित अधिकारी यांना सूचना देऊन जळालेल्या उसाच्या तोडणीला सुरुवात केली. मा. आमदार श्री बबनदादा शिंदे यांच्या विचाराचा वारसा घेऊन सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात वाटचाल करणारे माननीय सभापती युवानेते श्री विक्रमदादा शिंदे यांचे संबंधित शेतकरी व त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांनी खूप खूप आभार मानले.मा. आमदार श्री बबनदादा शिंदे आणि शिंदे कुटुंबीय हे सदैव शेतकरी आणि कष्टकरी लोकांचे प्रश्न सोडवतात आणि ते सदैव शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे आहेत व कायम राहतील असे राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष श्री ऋषिकेश (बंटीनाना) बोबडे म्हणाले.जळालेला ऊस, शेतकऱ्याचा सोडवलेला प्रश्न आणि ताबडतोब कारखान्याने केलेली ऊसतोड याचे सर्व परिसरातून स्वागत होत आहे. सर्वांनी कै. वि. शिंदे सह. साखर कारखान्याचे आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here