साप्ताहिक युवा मराठा प्रकाशन आणि राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघात सटाणा, नांदेड विभागासाठी पदाधिकाऱ्यांची निवड!

0
94

राजेंद्र पाटील राऊत

20211016_100755.jpg

साप्ताहिक युवा मराठा प्रकाशन आणि राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघात सटाणा, नांदेड विभागासाठी पदाधिकाऱ्यांची निवड!

ठाणे (अंकुश पवार, ठाणे शहर प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनेल)

विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर मुंबई नगरीत साप्ताहिक युवा मराठा प्रकाशन आणि राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी युवा मराठा न्युज चॅनेल आणि राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री.राजेंद्र पाटील – राऊत, श्रीमती आशाताई बच्छाव, व्यवस्थापकीय संपादक, श्री.अंशुराज पाटील – राऊत, वृत्त संपादक हे प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाचे श्री.विजय पवार (राष्ट्रीय अध्यक्ष/कार्यकारी संपादक),श्रीमती आशाताई बच्छाव(सचिव/व्यवस्थापकीय संपादक) व श्री.अंकुश पवार (महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष) यांच्या हस्ते श्री. दावल पागरे यांची सटाणा तालुका अध्यक्षपदी तर श्री.मनोज बिरादार यांना नांदेड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

तसेच या कार्यक्रमास मा.श्री.अविनाश पवार (अध्यक्ष,भारतीय मराठा संघ), मा.श्री. राजन घाग (अध्यक्ष, क्षत्रिय मराठा महासंघ/शिवसंग्राम संघटना,मुंबई),मा.श्री.रवींद्र देसाई (अध्यक्ष,कोल्हापूर जिल्हा रहिवासी शिवशाहू प्रतिष्ठान मुंबई ),
मा.श्री.भारत दादा पाटील (जय भवानी प्रतिष्ठान मुंबई ),
मा.श्री.जीवन भोसले (विश्वस्त, बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ मुंबई ), मा.श्री.संदीप भोसले (उद्योजक, मुंबई ),
मा.सरिता पाटकर (अध्यक्षा, अ.भा. महिला संघटना/भारतीय महिला फेडरेशन कौन्सेलर)मा. ॲड. प्रसाद संकपाळ (कायदेशीर सल्लागार,युवा मराठा,मुंबई) प्रशांत बच्छाव,गोपीनाथ भोये,भाऊसाहेब भामरे,ओम गाडेकर,प्रकाश गायकवाड ज्ञानेश्वर शेवाळे   इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here