मुंबई नगरीत युवा मराठा चे दमदार पदार्पण…विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी दिले पुढील वाटचालीस शुभाशिर्वाद..!

0
166

राजेंद्र पाटील राऊत

20211016_075425.jpg

मुंबई नगरीत युवा मराठा चे दमदार पदार्पण…विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी दिले पुढील वाटचालीस शुभाशिर्वाद..!

ठाणे (अंकुश पवार, ठाणे शहर प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनेल)

काल विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर मुंबई नगरीत साप्ताहिक युवा मराठा प्रकाशन आणि राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ कार्यालयाचे जल्लोषात मुंबईकरांनी स्वागत केले. मुंबई सारख्या स्वप्नांचा नगरीत लोअर परेल भागात सामान्य जनतेच्या मागण्या समस्या ,फक्त मराठा समाजाचे नव्हे तर अठरा पगड जाती धर्माच्या साप्ताहिक युवा मराठा प्रकाशन आणि राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ कार्यालय स्थापन होणे ही आम्हा सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
या कार्यक्रमास युवा मराठा न्युज चॅनेल आणि राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री.राजेंद्र पाटील – राऊत, श्रीमती आशाताई बच्छाव, व्यवस्थापकीय संपादक, श्री.अंशुराज पाटील – राऊत, वृत्त संपादक,श्री.अंकुश पवार, ठाणे शहर प्रतिनिधी, श्री. दावल पगारे प्रतिनिधी लखमापूर, श्री.प्रशांत बच्छाव विषेश प्रतिनिधी ,श्री. ज्ञानेश्वर शेवाळे, श्री.भाऊसाहेब भामरे प्रतिनिधी ब्राह्मणगाव, श्री. प्रकाश गायकवाड ओम गाडेकर हे प्रतिनिधी उपस्थित होते. हा सोहळा श्री. विजय पवार,कार्यकारी संपादक,मुंबई/महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी यांचा अध्यक्षतेखाली आयोजित मुख्य संपादक श्री. पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून उत्साहात यशस्वी पार पडला.
या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दसऱ्याचा दिवस असताना देखील कार्यक्रमास उपस्थित होते.
मा.श्री.अविनाश पवार (अध्यक्ष,भारतीय मराठा संघ),
मा.श्री. राजन घाग (अध्यक्ष, क्षत्रिय मराठा महासंघ/शिवसंग्राम संघटना,मुंबई),
मा.श्री.रवींद्र देसाई (अध्यक्ष,कोल्हापूर जिल्हा रहिवासी शिवशाहू प्रतिष्ठान मुंबई ),
मा.श्री.भारत दादा पाटील (जय भवानी प्रतिष्ठान मुंबई ),
मा.श्री.जीवन भोसले (विश्वस्त, बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ मुंबई ),
मा.श्री.संदीप भोसले (उद्योजक, मुंबई ),
मा.सरिता पाटकर (अध्यक्षा, अ.भा. महिला संघटना/भारतीय महिला फेडरेशन कौन्सेलर)
मा. ॲड. प्रसाद संकपाळ (कायदेशीर सल्लागार,युवा मराठा,मुंबई)

सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत युवा मराठा न्युज चॅनेल आणि राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाचे संस्थापक/ अध्यक्ष श्री.राजेंद्र पाटील – राऊत यांच्या हस्ते श्री.विजय पवार कार्यकारी संपादक,मुंबई/महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी, श्रीमती आशाताई बच्छाव व इतर महाराष्ट्रातील विविध भागातून प्रतिनिधी/पदाधिकारी यांच्या उपस्थित साप्ताहिक युवा मराठा अंकाचे प्रकाशन करण्यात आले. सर्वांना अंकाची प्रत देण्यात आली.

या सर्व समारंभात युवा मराठा न्युज चॅनेल,राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या पुढील वाटचालीस भरभरून मनापासून शुभेच्छा देताना आपले मनोगत मांडले….

“मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो व शुभेच्छा देतो.आमचे चळवळीतील कार्यकर्ते,सहकारी यांनी हे धाडसी पाऊल उचललं, आमच्या मनापासून शुभेच्छा”
– मा.श्री. राजन घाग (अध्यक्ष, क्षत्रिय मराठा महासंघ/शिवसंग्राम संघटना,मुंबई)

देशाची आर्थिक राजधानी,स्वप्ननगरी असलेल्या मुंबई शहरातसाप्ताहिक युवा मराठा प्रकाशन आणि राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले याचा अभिमान आणि लोअर परेल सारख्या गजबजलेल्या शहराच्या अगदी मध्यावर्ती असलेल्या भागातून प्रवास सुरू होत आहे याचे समाधान आहे. मी ग्वाही देतो की युवा मराठा हा फक्त मराठा समाजाच्या साप्ताहिक नसून संपूर्ण अठरा पगड जातींजमातीच्या लोकांच्या हकाचे,न्यायाचे,संघर्षाचे व्यासपीठ आहे.येथे समाजातील प्रत्येक घटकाचा विषय मांडला जाईल सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी युवा मराठा व ७२ प्रतिनिधी तत्पर राहतील ”
श्री.राजेंद्र पाटील – राऊत, संस्थापक/ अध्यक्ष युवा मराठा न्युज चॅनेल आणि राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ.
इतरही मान्यवरांनी युवा मराठा न्युज साप्ताहिक साठी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
अश्या प्रकारे विजयादशमी दिवशी मुंबई मधील लोअर परेल या ठिकाणी साप्ताहिक युवा मराठा प्रकाशन आणि राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. युवा मराठा न्युज चॅनेल महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनात,घराघरात पोहोचण्यास सज्ज झाला आहे. आता प्रत्येक हप्त्यात मुंबईकरांना प्रतीक्षा राहील युवा मराठा मध्ये पुढील हप्त्यात नाविन काय…?

Previous articleजळगावच्या लाखखोर सहाय्यक फौजदारास रंगेहाथ पकडले ..!
Next articleसाप्ताहिक युवा मराठा प्रकाशन आणि राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघात सटाणा, नांदेड विभागासाठी पदाधिकाऱ्यांची निवड!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here