लाभार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्या

0
50

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20211014-WA0084.jpg

लाभार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्या

जिल्हाधिकारी निमा अरोरा

अकोला:(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- महिला आर्थिक विकास महामंडळ, कौशल्य विकास विभाग, कृषी विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शासनाच्या विविध योजनाची माहिती व्हावी, याकरीता शासकीय योजनांची जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये महिला बचत गट तसेच उद्योग करु इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनाची सविस्तर माहिती घेवून आवश्यक ते सर्व दस्तऐवाजांची पूर्तता करून स्वयंप्रेरणेने योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटियार, जिल्हा अग्रणी बँकेचे आलोक तरोनिया, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे डि.एल ठाकरे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे, जिल्हा उद्योग केंद्राचे समन्वयक रत्नपारखी, खादी ग्रामोद्योगचे नंदा लव्हाळे, कृषी विभागाच्या ज्योती चोरे, महिला बचत गटाचे सदस्य, बेरोजगार युवक-युवती आदि उपस्थित होते.

शासकीय व निमशासकीय यंत्रणेव्दारे समाजातील विविध घटकासाठी शासनाव्दारे विविध योजना राबविल्या जातात. या योजना गरजू व्यक्तीपर्यंत पोहचवून त्यांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी या योजनाची माहिती होणे आवश्यक आहे. अशा कार्याशाळेच्या माध्यमातून सर्वांना शासनाच्या योजनाची माहिती होण्यास मदत होणार आहे. उद्योग करु इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांनी शासनाच्या योजनाची माहिती घेवून जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले. तसेच शासनाच्या विविध योजना शासकीय व निम शासकीय यंत्रणेने गरजुवंताना योजनाची माहिती व्हावी यासाठी जनजागृती करुन त्यांना योजनाची सविस्तर माहिती द्यावी. याकरीता त्यांना आवश्यक ती सर्व मदत करा, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी सबंधिताना दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा व्यवस्थापक महल्ले यांनी केले. तसेच सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागाच्या योजनांची माहिती दिली.

Previous articleहिप्परगा माळ येथे भक्तीविजय ग्रंथाची सांगता.
Next articleआमदार डॉ.राहुल पाटील यांच्या वाढ दिवसा निमित्ताने ”महा रक्तदान शिबीर,,आयोजित .
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here