सर्वच पक्षाच्या लोकांनी मला तिथे जायला सांगितलं…… कुठे चुकलो असेन तर त्यासाठी मी माफी मागतो – आमदार राजू नवघरे… ! दुसऱ्याच्या विचारावर चालणारा लोकप्रतिनधीं लोकांचे प्रश्न काय मांडणार…?

0
165

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20211014-WA0028.jpg

“सर्वच पक्षाच्या लोकांनी मला तिथे जायला सांगितलं……
कुठे चुकलो असेन तर त्यासाठी मी माफी मागतो – आमदार राजू नवघरे… ! दुसऱ्याच्या विचारावर चालणारा लोकप्रतिनधीं लोकांचे प्रश्न काय मांडणार…?

ठाणे (अंकुश पवार, ठाणे शहर प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनेल)

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांचा प्रताप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर चडून पुष्पहार अर्पण केला आहे. त्यामुळे सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे वसमत मतदार संघाचे आमदार यांनी हिगोली येते एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर चडून पुष्पहार अर्पण केला होता.
त्या संदर्भात युवा मराठा न्युज चॅनेल ने जोरदार विरोध केल्यानंतर प्रसिद्ध टीव्ही चॅनल्स माध्यमांना आमदार राजू नवघरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वच पक्षाच्या लोकांनी मला तिथे जायला सांगितलं. मी म्हटलं राजकीय माणसाला वर पाठवू नका. पण मला त्यांनी अखेर वर चढवलं…तिथे सगळेच होते. पण माझ्या एकट्याचाच पाय तिथे लावल्याचं दाखवलं जातंय. जर मी कुठे चुकलो असेन तर त्यासाठी मी माफी मागतो. माझी यात कुठे चूक नाही असं मी मानतो अशी प्रतिक्रिया माध्यमांना आमदार यांनी दिली आहे.

प्रश्न असा राहतो की, सर्वच पक्षाच्या लोकांनी अजून कोणत्या महापुरुषांची असेच विटंबना करा सांगितले तर आमदार राजू नवघरे करणार का? असे आमदार लोकांची भूमिका,प्रश्न विधान मंडळात काय मांडणार..?
लोकांना काय न्याय देणार,उद्या कोणी सांगितले की हे काही करतील, आमदार असलेला व्यक्ती असे संदर्भ नसलेले बेताल वक्तव्य करते,आणे चूक झाली वाटत असेल तर माफी मागतो असे म्हणते म्हणजे आपल्याला अजूनही चूक मान्य नसावी असेच दिसून येते? असो….

यापुढे राजकारणात उतरताना,महाराष्ट्राचा इतिहास,ज्या पक्ष्याचे आपण आमदार आहात त्या पक्ष्याचे आदरणीय पवार साहेब यांना तरी विश्वासात घेत चला.
आपण आमदार आहात कोणी लहान मुल नाही ह्याने सांगितलं म्हणून मी त्याला मारलं….या अर्थाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करून असे वाक्य बोलत आहात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here