युवा मराठा च्या पाठपुराव्याला मोठे यश….✍️ उर्जा मंत्री नितीन राऊत यांचे महावितरण कंपनीला विजेचे दर कमी करा, शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज पुरवठा देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.

0
149

राजेंद्र पाटील राऊत

20211012_195415.jpg

युवा मराठा च्या पाठपुराव्याला मोठे यश….✍️
उर्जा मंत्री नितीन राऊत यांचे महावितरण कंपनीला विजेचे दर कमी करा, शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज पुरवठा देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.

ठाणे (अंकुश पवार, ठाणे शहर प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनेल)

या विषयावर युवा मराठा न्युज चॅनेल ने
“विजेचा लपंडाव…. दि.७.१०.२०२१ रोजी
“विजेचा लपंडाव पुन्हा सुरू…लोडशेडींग संकटं अटळ
दि.११.१०.२०२१ रोजी बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या.

त्याअनुषंगाने आज दि.१२.१०.२०२१ रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्यात वीजेचे दर कमी करण्यासाठी व शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज पुरवठा देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत महावितरणला दिले.
नवीन कृषिपंप वीज धोरणात शेतकऱ्यांना 8 तास दिवसा वीज देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तथापि कृषीपंप वीज वाहिन्या अतिभारीत (ओव्हरलोड) होत असल्याच्या तक्रारी मिळत असल्याने वीज वाहिन्यांचे जाळे सक्षम करणे. रोहित्रांची संख्या व क्षमता वाढविण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम त्वरित करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. राज्यातील किती ठिकाणी आणि कोणते रोहित्र दिवसा 8 तास वीज देण्यास सक्षम नाही, हे शोधून त्यांच्या सक्षमीकरणासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
त्यामुळे युवा मराठा न्युज चॅनेल सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारे आणि सरकारला त्याची दाद द्यायला लावणारे सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ बनले आहे.

Previous articleजवाहर विद्यालयात जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण संपन्न
Next articleपुण्यात अल्पवयीन कब्बडीपटू मुलीची एकतर्फी प्रेमातून हत्या..! महाराष्ट्र हादरला,अजिदादांनी दिसले कारवाईचे आदेश….?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here