भूमीनंदन कॉलनीतील रस्ते निकृष्ट दर्जाचे, नगरसेवक संतोष गाताडे यांचा आत्मदहनाचा इशारा

0
351

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20211012-WA0019.jpg

भूमीनंदन कॉलनीतील रस्ते निकृष्ट दर्जाचे,
नगरसेवक संतोष गाताडे यांचा आत्मदहनाचा इशारा

कोल्हापूर  :(राहुल शिंदे) पेठ वडगाव प्रभाग 3 मधील भूमी नंदन कॉलनी येथे डांबरीकरण रस्ता पूर्णपणे उखडला आहे. रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारास व कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करणाऱ्या संस्थेवर ही कारवाई करावी अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा सत्ताधारी गटातील नगरसेवक संतोष गाताडे यांनी सर्वसाधारण सभेत दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा री. स. न. 513 मध्ये बसविण्यासाठी अजेंड्यावर विषय होता. या चर्चेदरम्यान नगरसेवक जवाहर सलगर यांनी हा पुर्णाकृती पुतळा री. स. न. 518 मध्ये व्हावा अशी मागणी काही नागरिकांनी विरोधी गटाकडे केली आहे. या सभेत सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here