परीक्षाही तुम्ही घेतली, उत्तरही तुम्हीच दिले? नापास ही तुम्हीच झालात…मग जनतेला वेठीस का धरले… युवा मराठा न्युज चॅनेल च्या वतीने जनतेचा संतप्त सवाल…?

0
92

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20211012-WA0015.jpg

परीक्षाही तुम्ही घेतली, उत्तरही तुम्हीच दिले?
नापास ही तुम्हीच झालात…मग जनतेला वेठीस का धरले…
युवा मराठा न्युज चॅनेल च्या वतीने जनतेचा संतप्त सवाल…?

ठाणे (अंकुश पवार, ठाणे शहर प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्यूज चॅनल)

काल महविकास आघाडी सरकारने लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराविरोधात ११ ऑक्टोबरला राज्यव्यापी बंदचं आवाहन केलं होत. उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूरला शेतकऱ्यांना चिरडून मारण्याची जी घटना घडली त्याचा महाराष्ट्रात निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र ११ ऑक्टोबरला बंद चे आव्हान केले होते, शरद पवार यांच्या बंद अहिंसा,शांततेत करणाच्या आवाहनाला त्यांच्याच मित्र पक्ष्याने केराची टोपली दाखवली आहे असे दिसून येते.

कारण कालच्या महाराष्ट्र बंद ल हिसक वळण लागले आहे,गालबोट लागले आहे. बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी उस्पूर्थपणी बंदला प्रतिसाद दिला. तर काही ठिकाणी व्यापाऱ्यांना , रिक्षचालकांना धमकवण्यात,मारण्यात आले. बाकी रेल्वे, अत्यावश्यक सेवा सुरू होत्या.
शिवसैनिक आक्रमक झाले
मुंबई मध्ये शिवसैनिकांनी रस्ता रोको केला,मुंबईत बेस्टच्या ८ आणि खाजसी १ बसची तोडफोड करतात आली.धारावी,चारकोप, एनोर्बित मॉल, ओशिवरा,ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत.तर साताऱ्यात
शिव सैनिकांकडून दुकानात खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. ठाण्यात उपमहापौर यांच्या पतीने बंद दरम्यान रिक्षा चालकाला मारहाण केली त्यांचावर गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईत विक्रोळी भागात ईस्टन एक्स्प्रेस हायवेवर शिवसैनिकांनी टायर जाळून विरोध केला,तिथे देखील वाहतूक कोंडी झाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने पुण्यात आंदोलन करण्यात आले त्यात भाजप “हटाव,देश बाचाओ” अश्या घोषणा देण्यात आल्या. काँग्रेस नी थेट राजभवनाच्या गेट वर उभे राहून आंदोलन केले.
शासन पुरस्कृत या बंदला प्रतिसाद मिळण्यासाठी जबरदस्ती दमदाटी,तोडफोड करून कोणत्या शेतकऱ्याला न्याय मिळाला,लखीमपूरमधल्या की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना असा प्रश्न उपस्थित होतो. स्वतःच बंद पुकारून,स्वतःच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करायचे हे कितपत योग्य आहे?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here