संग्रामपूर तालुक्यात वाण नदीचा पुर ओसरताच रेती व्यावसायिकांना फुटल्या  आनंदाच्या उकळ्या !       

0
46

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20211011-WA0056.jpg

संग्रामपूर तालुक्यात वाण नदीचा पुर ओसरताच रेती व्यावसायिकांना फुटल्या  आनंदाच्या उकळ्या !                        बुलढाणा,(स्वप्निल देशमुख ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)       
मागील आठवड्यात वाण नदीला पुर येउन गेला . पुरानंतर नदी पात्रातील खड्डे बुजुन नवीन रेती वाहुन आली . अर्थातच मागील रेती उपश्याचे पुरावे नष्ठ झाले व नवीन रेती साठा वाहुन आला याचा आनंद रेती व्यावसायीकांना होणे साहजीकच आहे . तालुक्याचे पुर्व दिशेला असलेल्या या नदीतील एक ही रेतीघाट शासनाने हर्रास केला नसला तरी नदीतुन प्रचंड रेती उपसा होणे सुरुच आहे . म्हणतात ना आनंद ही मानुन घेण्याची मानसीक प्रक्रिया आहे असेच काहीसे अनेक रेती व्यावसायीकांचे सध्या झाले आहे . या विनापरवाना रेती वाहतुक व्यवस्थेकडे महसुल विभागाचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष असल्याने रेती व्यावसायीकांना आनंद होणे साहजीक आहे . कारण यातुन सध्या रग्गड कमाई होत असल्याने या धंद्यात अनेक जण उतरले आहेत . तालुक्यात नसला तरी मागील आठवड्यात सातपुडा पर्वतीय क्षेत्रात बऱ्यापैकी पाउस झाला त्यामुळे वाण धरणाचे दरवाजे उघडल्या गेले होते त्यामुळे ५ / ६ दिवस वाण नदी दुथडी भरून वाहीली . या पुरामुळे वाण नदीत मोठ्या प्रमाणात रेती साठा वाहुन आला . मागील काही दिवसात रेती उपश्याने पडलेले खड्डे बुजुन गेले . म्हणुन गेल्या तीन दिवसा पासुन या वाण नदी पात्रात वाहनांची जणु काही जत्राच भरल्याचे रोजचेच चित्र आहे . वडगाव वाण पासुन तर पातुर्डा देउळगाव पर्यंतच्या या १० कि . मी . च्या अंतरात शेकडो वाहन चालक मालक रात्र दिवस रेती उपसा करत आहेत . कोणी स्टॉक करून ठेवत आहेत तर काही जण अकोट अकोला शहरापर्यंत रेती पोहोचवत आहेत . जसे जमेल तसे राष्टीय संपत्तीची लुट सुरु असतांना यावर नियंत्रण ठेवणारा महसुल विभाग ही बाब निव्वळ उघड्या डोळ्याने पाहत आहे . म्हणुन कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी एस राममुर्ती यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी संग्रामपूर तालुका वासी करत आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here