हे तर ढोंगी सरकार…या सरकारचे नाव “बंद” सरकार ! विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस बरसले..

0
53

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20211011-WA0072.jpg

हे तर ढोंगी सरकार…या सरकारचे नाव “बंद” सरकार ! विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस बरसले..

ठाणे (अंकुश पवार, ठाणे शहर प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्यूज चॅनल)

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारण्याच्या घटनेविरोधात महाराष्ट्रातील महाविकासआघाडीने राज्यव्यापी बंदी हाक दिलीय.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. हे तर ढोंगी सरकार…या सरकारचे नाव “बंद” सरकार आहे असा प्रकारे यांनी आघाडी सरकारचे जणू बार्सेच घातले आहे. महाविकास सरकारचा ढोंगीपणा समोर आला आहे. लखीमपूर येथील शेतकऱ्यांच्या अन्यायाविरोधात महाराष्ट्रात बंद केलं जातं परंतु महाराष्ट्रात अतिृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मात्र मदत केली जात नाही असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
तसेच ही तीच मंडळी आहेत ज्यांनी बावधन पुणे येथे पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यावर गोळीबार केला होता त्यांना आता बंद करण्याचा काय अधिकार आहे असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.
इतिहासात पहल्यांदाच ज्यांच्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी,प्रशासन चालवण्याची जबाबदरी आहे तेच कॅबिनेट बैठकीत महाराष्ट्र बंद करण्याचे प्रस्ताव पास करतात ह्या निर्णयाविरोधात आम्ही आहोत असे फडणवीस यांनी विचार मांडले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here