अजमिर सौंदाणे ता.सटाणा येथे आज ग्रामसभा विविध विषयांवर चर्चा होऊन संपन्न —               

0
31

राजेंद्र पाटील राऊत

20211011_063523.jpg

अजमिर सौंदाणे ता.सटाणा येथे आज ग्रामसभा विविध विषयांवर चर्चा होऊन संपन्न —                                              सटाणा,(जगदिश बधान प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-   ग्रामपंचायत अजमिर सौंदाणे ता.सटाणा येथे लोकनियुक्त सरपंच श्री.धनंजय पवार यांचे अध्यक्ष ते खाली विविध विषयांवर चर्चा होऊन संपन्न झाली. यावेळी अपंग संघटणेचे जिभाऊ देवरे यांनी पंतप्रधान घरकुल योजना या विषयावर खूपच आक्रमक पवित्रा घेत ड यादीमधील वगळून टाकण्यात आलेल्या नावाबद्दल ग्रामपंचायत प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार केला , तसेच गावातील सांडपाण्यावर ग्रामपंचायत ने काय उपाययोजना केल्या याविषयी बिरसा फायटर चें सचिन सोनवणे यांनी विचारणा केली, वैलगोठा, शेळीपालन या विविध योजनांची आलेल्या यादी मधील आमचे नाव का वगळण्यात आले व संभाव्य कृति आराखडा यात कोण कोणते कामे मंजूर आहेत व किती निधी मंजूर आहे हे प्रश्न उपस्थित करताना माजी ग्रामपंचायत सदस्य चरणसिंग पवार यांनी प्रशासनाला धारेवर धरले , तसेच पिण्याच्या पाण्यासाठी पुढील उपाययोजना काय या विषयावर राहुल मगर यांनी प्रश्न मांडला या सर्व ग्रामसभेत उपस्थित प्रश्नांची ग्रामविकास अधिकारी श्री. बी एन ठोके यांनी ग्रामसभेला उपस्थित जनतेला समर्पक उत्तरे देत समजावून सांगितले यावेळी उपसरपंच वंदना मोरे , दीपाली मगर, सपना नंदाळे, जयश्री मगर,भूषण पवार , अर्जुन माळी, कविता पवार, वंदना माळी, मनीषा माळी, रवी पाटोळे, दीपक शेवाळे , कांती मोरे, राहुल मगर , बाळा पवार,यांचेसह तंटामुक्ती अध्यक्ष किरण पवार , सुदाम देवा, शरद सरदार, गुलाब माळी, रमेश पवार, बारकू मामा, महेश गवळी, राम गायकवाड, ज्ञानदेव माळी, उत्तम पवार,भावडू धनसिंग पवार,सुपडू वाकळे,माणिक कापुरे, शैलेश पवार,निलेश पवार,आदी नागरिकांनी उपस्थित रहात ग्रामसभेत सहभाग नोंदवला.

Previous articleतेल्हारा पंचक्रोशितील सुप्रसिद्ध विठोबा महाराज यांना शिवीगाळ व मारहाण 
Next articleजुळे सोलापुरातील महात्मा बसवेश्वर उद्यान निर्मितीसाठी समाजबांधवांची बैठक :समिती गठीत.   
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here