तेल्हारा पंचक्रोशितील सुप्रसिद्ध विठोबा महाराज यांना शिवीगाळ व मारहाण 

0
88

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20211010-WA0057.jpg

तेल्हारा पंचक्रोशितील सुप्रसिद्ध विठोबा महाराज यांना शिवीगाळ व मारहाण
बुलढाणा,ब्युरो चीफ स्वप्निल देशमूख युवा मराठा न्यूज
भक्तांची पोलीस स्टेशनमध्ये एकच गर्दी

तेल्हारा तालुक्यातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धा स्थान असलेले विठोबा महाराज यांना पुरुषोत्तम पांडुरंग इंगळे या इसमाने विठोबा महाराज यांना मारहाण व शिवीगाळ वानखेड & दूर्गादैत्य या गावा मधून तामगाव पोलीस स्टेशन ला निवेदन दिले

भाविकांची गर्दी
सविस्तर वृत्त असे की, तेल्हारा परिसरात सर्वांनाच परिचित असलेले व सुप्रसिद्ध विठोबा महाराज हे केशव खोटरे यांनी आणलेल्या नवीन हार्वेस्टर ची पूजा करण्यासाठी व तीर्थप्रसाद घेण्यासाठी खोटरे यांच्या घरी गेले असता पुरुषोत्तम इंगळे या इसमाने खोटरे यांच्या घरी जाऊन अर्थहीन कारणावरून तेल्हारा परिसराचे दैवत असलेल्या विठोबा महाराज यांना घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी प्रदीप पोहणे, विजय देशमुख, टीकमचंद खडोले, अनिल पोहणे यांच्या समक्ष सदर घटना घडली .

 

वास्तविक पाहता पुरुषोत्तम इंगळे व विठोबा महाराज यांचा अर्थाअर्थी कुठेही संबंध येत नाही विठोबा महाराज हे नेहमी धार्मिक कार्यात तल्लीन असतात महाराज वर्षभर स्वकष्टाने शेतीत राब राब राबून आलेले सर्व उत्पन्न हे एक महिना तेल्हारा शहरात राम जप व अन्नदानावर खर्च करतात. यावेळी कोणत्याही भक्तांकडून देणगी घेण्यात येत नाही. यावेळेस हजारो भाविक भक्त या धार्मिक कार्यात सहभागी होतात आणि दररोज विठोबा महाराजांच्या मठावर दत्त जपाचा व महाप्रसादाचा कार्यक्रम महाराजांनी केलेल्या कष्टाच्या पैशातून चालूच असतो.विठोबा महाराजांना मारहाणीची घटना माहित पडताच तेल्हारा पोलीस स्टेशन मध्ये संतप्त झालेल्या भाविक भक्तांची व नागरिकांची एकच गर्दी झाली होती आरोपीला त्वरित अटक करून कडक कारवाई करा अशी मागणी नागरिकांकडून होत होती. काहीही कारण नसताना महाराजांना मारहाण व शिवीगाळ करण्यात आली एवढे झाल्यावरही व प्रचंड असा जनसमुदाय पाठीमागे असतानासुद्धा महाराजांनी फिर्याद दाखल करण्यास नकार दिला व पोलीस स्टेशन मध्ये येण्यास सुद्धा नकार दिला यावरूनच महाराजांचे मोठे मन व क्षमावृत्ती दिसून येते हे येथे विशेष मात्र भक्तांनी स्वतःहून पुढाकार घेऊन इंगळेच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली.
या वेळी निवेदन देताना
सत्यनारायण चांडक
सूभाष हागे
पवन पालीवाल
श्रीकृष्ण शंकर रौदळे
पाढूरंग हागे
सूदामा उभे
व वानखेड & दूर्गादैत्य येथून बहुसंख्य नागरीक उपस्थित होते

Previous articleदेवळाली प्रवरा येथे बिबटया चा धुमाकूळ नागरिक भयभीत ..?
Next articleअजमिर सौंदाणे ता.सटाणा येथे आज ग्रामसभा विविध विषयांवर चर्चा होऊन संपन्न —               
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here