फेमस माव्यामध्ये गांजाचे पाणी…? विद्यार्थी व तरुणपिढीचे आरोग्य धोक्यात! टेंभूर्णी शहरातली ७०% शालेय विद्यार्थी व तरुण पिढी मावा

0
69

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20211006-WA0058.jpg

फेमस माव्यामध्ये गांजाचे पाणी…? विद्यार्थी व तरुणपिढीचे आरोग्य धोक्यात!

टेंभूर्णी शहरातली ७०% शालेय विद्यार्थी व तरुण पिढी मावा च्या विळख्यात
युवा मराठा न्यूज सोलापूर जिल्हा ब्युरो चीफ  महादेव घोलप.

टेंभूर्णी – मागील दोन वर्षंपासून मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यातील कित्येक भागांमध्ये सहजपणे उपलब्ध होणारा मावा पण त्यात आहे गांजाचे पाणी. ज्या ठिकाना हून सुपारी मगवतात त्याच ठिकाणी गांजाचे पाणी त्या सुपारी वर टाकले जाते. अशी चर्चा नागरिकांमधून ऐकायला येत आहे.
गांजा हा खाल्ले ही जाऊ शकते आणि तसेच विरघळून पिताही येते जेव्हा एखादी व्यक्ती गांजा धुम्रपान करते, तेव्हा THC रक्ताच्या द्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहोचते आणि गडबडण्यास सुरवात करतो आपले न्युरॉन्स किंवा मेंदू नियंत्रणाबाहेर जातात, तेव्हा नक्कीच व्यक्तीला आनंदाचा अनुभव होतो. परंतु, त्यांना बराच काळ काही आठवत नाही व त्यांना पूर्वीसारखे काहीच आठवत नाही व याच्या दैनंदिन सेवनाने सेवन करणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्यावर गंभीर व दीर्घकालीन मानसिक व शारीरिक परिणाम होतात व सेवन करणारी व्यक्ती याच्या आहारी जाते व त्यातून बाहेर पडणं एक काळ गेल्यानंतर कठीण होतं गंभीर परिणाम असतानासुद्धा गांजा व त्यासाठी लागणारे इतर तत्सम पदार्थ सहजपणे उघड्या वर सोलापूर मध्ये उपलब्ध होत आहेत सोलापुरातील प्रशासनाच्या डोळ्यासमोर हा सगळा प्रकार उघडपणे सुरू आहे याचा आश्चर्य वाटतं अजामीनपात्र गुन्हा असताना सोलापूरकरांच्या येणाऱ्या पिढ्या बरबाद करणारा इतक्या गंभीर प्रकारचा व्यवसाय उघडपणे प्रशासनाच्या मदतीने सुरू आहे ही खूप गंभीर बाब आहे शहरातल्या कित्येक चौकांमध्ये तो सहज उपलब्ध होतो कॉलेजचे कित्येक तरुण-तरुणी रांगा लावून ते घेण्यासाठी उभे असतात.
20-25 रुपयाला मावायची एक पुडी ते पण गांजाचे पाणी मिश्रित केलेली सहजा सहजी उपलब्ध होते. स्वतः मावा खाणारे शालेय विद्यार्थी असे म्हणतात की हा मावा खाल्ल्यावर डोक्यात थोडीशी गुंगी येते किंवा आम्ही हा मावा सोडण्याचा प्रयत्न केला तरी हा मावा सुटत नाही. कित्येक डॉक्टर इंजिनिअर उच्चशिक्षित कॉलेजला जाणारे विद्यार्थी विद्यार्थिनी सोलापूर शहरातील याचे दररोज सेवन करतात ही गोष्ट दुर्दैवी आहे सहजपणे उपलब्ध होणारा व स्वस्तातला व सेवन केल्यानंतर फ्रेश म्हणून या मावेच्या नशेला तरुण पिढी प्राधान्य देत आहे सोलापूर शहरातील वाढती बेरोजगारी तरुणांन मधली वाढलेली निराशा व तसेच इतर मुलांचे अनुकरण करण्याच्या नादात याचे सेवन करणाऱ्या तरुणामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे आणि ही बाबा चिंतादायक आहे .वितरकांना चौकशी केली तेव्हा लक्षात आलं की सोलापूर शहरातील 70 टक्के तरुण सध्या या मावेच्या विळख्यात अडकलेली आहे.शहरातील प्रतिष्ठित कॉलेज शाळा जवळ हे विक्रेते सहजपणे आढळून येतात त्यामुळे तरुण पिढीला या व्यसनाच्या आहारी पाडुन स्वतःचे घर भरण्याचे कुटील कारस्थान पद्धतशीरपणे सुरू आहे हे दुर्दैवी आहे.
शहरात कित्येक गोष्टी चालतात ज्या कायद्याच्या चौकटीत बसत नाहीत त्या गोष्टींबद्दल आम्हाला काहीही नाही व तो आजचा विषय ही नाही परंतु येणाऱ्या पिढ्या बरबाद करणारा हा व्यवसाय कुठेतरी थांबला पाहिजे,यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन जबाबदार असेल.खुल्या आम विक्री चालू आहे. तसेही मावा विक्री करायला कायदेशीर परवानगी नाहीच.
हळूहळू सबंध शहरातील तरुण पिढी या गांजा च्या विळख्यात आडकन्या आधी संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन विक्रेत्यांवर व तसेच यांचं सेवन करणाऱ्यांवर सुद्धा कठोर कारवाई करून शहरात कायद्याचा धाक प्रस्थापित करावा. या मागे काय हितगुज आहे का असा सवाल नागरिकांन मध्ये उपस्थित राहिला आहे. प्रशासनाला कधी जाग येईल आणि तरुण पिढीची माव्या पासून कधी सुटका होईल याचं उत्तर सामान्य नागरिक सोलापूर जिल्हा चे पोलिस अधीक्षका तेजस्वी सातपुते यांना विचारत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here