पुण्यातील राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस मध्ये विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत                                                         

0
1700

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20211005-WA0045.jpg

पुण्यातील राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस मध्ये विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत                                                                   भोर,(महेश भेलके पाटील प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील माजी मंत्री अनंतरावजी थोपटे साहेब हे राजगड शिक्षण संकुल चे संस्थापक अध्यक्ष आहेत,गेली दीड वर्ष शिक्षण क्षेत्राला लागलेले टाळे हळू हळू खुले केले जात आहेत या टप्प्यात 4 ऑक्टोबर रोजी कोरोना चे सर्व नियम पाळून तसेच आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे मनोबल वाढवण्याचे एक आगळे वेगळे कार्य राजगड संस्थे मार्फत करण्यात आले ,यावेळी गेली दीड वर्षानंतर विद्यार्थी महाविद्यालयात आले असता त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले ,
आम्ही विद्यार्थी म्हणून आज कॉलेज मध्ये आलो पण आम्हाला अपेक्षित नसलेले आणि मनाला भावूक करून टाकेल अस स्वागत आमच्या राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस ने केले यामुळे इथून पुढील शिक्षण घेण्यासाठी आम्हाला एक नवीन ऊर्जा मिळाली अशी भावना उपस्थित विद्यार्थ्यांनि आमच्या शी बोलताना व्यक्त केली ,
प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष भोर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री संग्राम थोपटे तसेच संस्थेच्या मानद सचिव डॉ. सौ भाग्यश्रीताई पाटील यांनी कोरोना प्रतिबंधात्मक सर्व उपाययोजना करून विद्यार्थी ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व संबधीत सर्व कर्मचारी यांनी देखील सर्व खबरदारी घेत कामकाजास् सुरवात करावी अशा मार्गदर्शक सूचना देखील केल्या ,विद्यार्थ्यांच्या स्वागत प्रसंगी महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ.श्री एस.बी.पाटील,प्रो.श्री डी.के.खोपडे राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस चे इस्टेट मॅनेजर श्री राहुल खामकर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here