बॅंकेतून काढलेली रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवून सलूनमध्ये दाढी करण्यास जाणे एका युवकाला चांगलेच महागात पडले 🛑

0
82

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20211004-WA0040.jpg

🛑 बॅंकेतून काढलेली रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवून सलूनमध्ये दाढी करण्यास जाणे एका युवकाला चांगलेच महागात पडले 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे ( उरळीकांचन ):- बॅंकेतून काढलेली रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवून सलूनमध्ये दाढी करण्यास जाणे एका युवकाला चांगलेच महागात पडले आहे. चोरट्याने भर दुपारी डिक्कीतून सुमारे २ लाखांची रोकड लंपास केली आहे. उरुळी कांचन येथे शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सुनील यादव (वय- २५, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील एलाईट चौकातील एक्सिस बँकेतून यादव यांनी २ लाखांची रोख रक्कम काढली होती. दुपारी एकच्या सुमारास काढलेली रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवले. त्यानंतर एका खाजगी रुग्णालयाच्या बाहेर गाडी लावून तो सलूनमध्ये दाढी करण्यासाठी गेला होता.  दाढी झाल्यावर त्याने दुचाकीजवळ येऊन पाहिले असता, गाडीची डिक्की उघडी दिसली.

आजूबाजूच्या नागरिकांकडे त्याने विचारपूस केली मात्र कोणीही काही पाहिले नसल्याचे सांगितले. त्यावरून कोणीतरी आपल्या गाडीतून रोकड लंपास केल्याचे लक्षात येताच त्याने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्य़ाद दिली.

त्यानुासर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. लोणी काळभोर पोलीस अधिक तपास करीत आहेत. ⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here