एकाचवेळी महाराष्ट्रातल्या सतरा जिल्ह्यात राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ पदाधिका-यांच्या निवडी!

0
116

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210908-WA0011.jpg

एकाचवेळी महाराष्ट्रातल्या सतरा जिल्ह्यात राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार
महासंघ पदाधिका-यांच्या निवडी!
(साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
मुंबई –महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अठरा पगड जातीच्या विकासासाठी कार्यरत झालेल्या आश्रयआशा फाऊंडेशन प्रणित राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या एकूण सतरा जिल्ह्यातील पदाधिका-यांच्या एकाचवेळी निवडीच्या घोषणा केल्या जाणार असल्याची माहिती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय पवार यांनी दिली.
राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या माध्यमातून माहिती अधिकार कार्यकर्त,पोलिस मित्र,सामाजिक कार्यकर्ते,आणि पत्रकार बांधवाची राज्यव्यापी संघटनशक्ती विविध सामाजिक व विकासात्मक प्रश्नांवर लढा देतानांच,अन्याय अत्याचार ,भ्रष्टाचार विरुध्द क्रांतिकारी लढा देईल.व त्यासाठी महासंघाचे प्रखर व ज्वलंत असे कार्य सुरु झाले आहे.पत्रकार,माहिती अधिकार कार्यकर्त,सामाजिक कार्यकर्ते ,पोलिस मित्र यांच्यावरील अन्याय अत्याचार व संकटाना वाचा फोडून एकजूटीने महासंघाच्या माध्यमातून प्रश्न सोडविले जातील.व मंत्रालयापासून तर शासन दरबारपर्यत महासंघ सातत्याने कार्यकर्त्यांच्या हितासाठी कार्यरत राहणार असल्याचे शेवटी विजय पवार यांनी बोलताना सांगितले.

Previous articleकोपर्डी प्रकरणाची लवकर सुनावणी होण्यासाठी शासनाची उच्च न्यायालयाला विनंती
Next articleनवे पारगाव येथे यशवंत सेनेच्या आधारकार्ड मोबाईल लिंकिंग कॅम्प मध्ये 335 नागरिकांनी घेतला लाभ           
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here