डॉक्टर संदीप मोहिते यांना विवेक वाचनालय अंबप मार्फत वैद्यकीय क्षेत्रातील राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर

0
172

डॉक्टर संदीप मोहिते यांना विवेक वाचनालय अंबप मार्फत वैद्यकीय क्षेत्रातील राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर

राहुल शिंदे ब्युरो चिफ कोल्हापूर 

5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित अंबप गावातील आजी-माजी शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी अनंत शांती बहुउद्देशीय सेवा संस्था महाराष्ट्र राज्य यांचा वैद्यकीय क्षेत्रातील राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि कोविड काळात केलेल्या निरंतन वैद्यकीय सेवेबद्दल डॉक्टर संदीप मोहिते यांचा सत्कार वारणा कारखान्याचे संचालक प्राध्यापक प्रदीप तोडकर यांच्या हस्ते करण्यात आला.
कोरोना महामारी च्या काळात रुग्णांची सेवा आणि आर्या वेदिक मेडी लाईन संस्थेच्या माध्यमातून डॉक्टरांना covid-19 उपचार मार्गदर्शन वेबिनारस चे आयोजन करून उल्लेखनीय कार्य चालू असले त्याबद्दल प्राध्यापक प्रदीप तोडकर, प्राध्यापक नंदकुमार माने, प्राध्यापक महिंद नीलजे त्यांनी कौतुक केले. याप्रसंगी विविध पुरस्कार प्राप्त श्री हरिश्चंद्र गायकवाड सर, श्री विलास नाईक सर तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्ष श्री बी टी पाटील, संयोजक राहुल माने, संपत कांबळे, ग्रंथपाल अमोल कुलकर्णी, आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here